Trimbakeshwar Temple Controversy 
नाशिक

Trimbakeshwar Temple Controversy : "उरुसाची परंपरा नक्कीच जुनी, मात्र..." तथ्य काय? इतिहास अभ्यासक म्हणतात...

प्रतीक जोशी

Trimbakeshwar Temple Controversy : आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेत हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असे नियम आहेत. मात्र तरीही 13 मे रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास काही व्यक्तींनी उत्तर (महाद्वार) दरवाजाने जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला. या घडलेल्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली.

या घटनेनंतर अनेक नवनवीन बाबी समोर येऊ लागल्या. यात संदल मिरवणूक यात मंदिराच्या पायरीवर जाण्याची परंपरा 100 वर्ष जुनी आहे असे सांगण्यात आले. याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरो दिला. मात्र त्र्यंबकेश्वरमध्ये जर अशी काही परंपरा असेल तर मग याबाबत तक्रार का दाखल करण्यात आली असाही प्रश्न उपस्थित केला गेला.

या सर्व वादात नेमक तथ्य काय याबाबत त्र्यंबकेश्वर मधील इतिहास अभ्यासक राजेश दीक्षित यांच्याकडून सविस्तर जाणून घेण्याचा सकाळने प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, त्रंबकेश्वर मंदिराला मोठा इतिहास आहे. उरुसाची परंपरा नक्कीच जुनी आहे. मात्र अशा प्रकारे मंदिरात कधीही यानिमित्ताने कोणीही प्रवेश केलेला नाही.

संदल (उरूस) मध्ये असलेली लोक त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर उभे राहून मंदिराच्या दिशेने धूप दाखवतात हेही तितकेच सत्य आहे. मात्र यासाठी ते मंदिराच्या पायरीवर किंवा पायरी ओलांडून खाली कधीही जात नाहीत, असे राजेश दीक्षित यांनी सांगितले.

त्यामुळे हा घडलेला संपूर्ण प्रकार वाद वाढविण्याच्या दृष्टीने होता की काय असाही संशय नक्कीच येऊ शकतो. मात्र अशा प्रथा आणि परंपरा अस्तित्वात नाही. मंदिर प्रशासनाचे कामकाज ब्रिटिश काळापासून एक संथ मार्गाने सुरू असून ज्यावेळी ब्रिटिश प्रशासक होते. त्यावेळी कधीही ब्रिटिश लोक सुद्धा मंदिरात दर्शनासाठी गेले नाहीत. याच्या इतिहासात नोंदी आहेत. त्यामुळे हा प्रकार कोणीतरी उकसवून केला असल्याचं वाटतं, अशी शंका राजेश दीक्षित यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT