Brothers of all religions sitting together in the Gao Jeevan pageant held on Sunday by the Mahadevi Trustee esakal
नाशिक

Nashik News: त्र्यंबकेश्वरला पंगतीतील भेदाला मूठमाती! अंनिसने आक्षेप घेतलेली गावजेवणातील वेगळी पंगत बंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : त्र्यंबकेश्वर येथील ग्रामदेवता महादेवीच्या गाव जेवणाच्या पंगतीत विशिष्ट जातीतील व्यक्तींना वेगळा स्वयंपाक करण्याची व जेवणासाठी वेगळी पद्धत बसण्याची परंपरा बंद झाली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्या तक्रारीनंतर दखल घेत ही प्रथा बंद करण्यात आल्याचे अंनिसने म्हटले आहे. (Trimbakeshwars caste discrimination ends andhashraddha nirmulan samiti objected to separate pangat in village meal Nashik News)

त्र्यंबकेश्वरमधील महादेवी ट्रस्ट कडून होणाऱ्या गावजेवणाच्या पंगतीत गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच खरेदी केलेल्या अन्नातून वेगळे शिजवले जाते तर इतर बहुजन समाजबांधवासाठी वेगळी पंगत ठेवली जाते, अशी तक्रार होती.

त्याबाबत अंनिसने जेवणाचा आनंद घेण्यासाठी येणारे सर्व गावकरी हे एकाच ठिकाणी शिजवलेल्या आणि एकाच पंगतीत वाटप होऊन पंक्तीतील भेदाभेद थांबविण्याची मागणी केली. तहसीलदार (त्र्यंबकेश्वर) व पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले.

पंगतीभेदाबाबत चर्चा केली. अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, डॉ. सुदेश घोडेराव, अॅड समीर शिंदे, संजय हरळे आदींनी विरोध दर्शविला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तहसिलदारांनी संबंधित विश्वस्तांना बोलावून समज दिली. जिल्हा पोलिस प्रमुखांनी कायद्याचे पालन करून, एकोप्याने राहून, सर्वांनी एकाच पंगतीत भोजनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले.

त्याला प्रतिसाद मिळाला असून, त्यानंतर ट्रस्टींनीही योग्य तो निर्णय घेऊन, सर्वांनी एकच पंगतीत भोजन घेण्यासाठी सर्वांना आवाहन केले. त्यामुळे वर्षानुवर्षं चालत आलेली विशिष्ट समाजाची वेगळी पंगत बसण्याची प्रथा सर्वांच्या प्रयत्नातून संपुष्टात आली.

यात जरी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतला तरी त्यासाठी तहसीलदार, पोलिस निरीक्षक व त्यांचे सहकारी, महादेवी ट्रस्ट यांनी मोठे धाडस दाखवले. अशा अनिष्ट प्रथांना सगळ्यांनीच विरोध केला पाहिजे. असे आवाहन महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात आले.

"गावजेवण पंक्तीभेद होत असल्याचे निदर्शनास आले. तशा प्रकारच्या तक्रारी स्थानिक भाविकांकडून प्राप्त झाल्यानंतर प्रशासन व ट्रस्टींशी सुसंवाद केला. त्यातून हे परिवर्तन झाले आहे. अंनिस याचे स्वागत करीत आहे." - संजय हराळे, कार्याध्यक्ष, अंनिस, त्र्यंबकेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT