sogras truck 1.jpg 
नाशिक

दुचाकीस्वारांना वाचवायला गेलेल्या ट्रकचालकाचे सुटले नियंत्रण; आणखी चार जणांचा जीव धोक्यात

धनंजय वावधने

सोग्रस (जि.नाशिक) : दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. आणि मग असा प्रकार घडला की आणखी चार जणांचा जीव धोक्यात आला. काय घडले नेमके वाचा...

काय घडले नेमके वाचा...
चांदवडहून नाशिककडे जाणारा मालवाहू ट्रक (आरजे १४, जीएल ३४ ८६)चे चालक व क्लीनर रात्री अकराच्या सुमारास चांदवडकडून नाशिककडे जाताना सोग्रसजवळ आले असता अचानक दोघे दुचाकीस्वार रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मध्येच आले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने सरळ रस्त्यालगतच्या शिवाजी गांगुर्डे यांच्या साई मल्हार हॉटेलला धडक दिली.

दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात हॉटेलला धडक

या धडकेने हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर ट्रकचालक व वाहक गंभीर जखमी झाले. त्यांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळी अकराला पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोमवारी (ता. १४) रात्री अकराच्या सुमारास भरधाव ट्रकने दिल्याची घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Man Ki Baat : लग्नात काढला अख्ख्या गावाचा विमा, नांदेडच्या 'या' कुटुंबाचे पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये केले कौतुक

Ketan Agarwal Murder Case: "लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं"; चौकशीतून सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

ED Raid Former DIG : माजी डीआयजीकडे ५३ कोटींची संपत्ती; मुंबई, कोलकाता, आसाममध्ये ईडीचे छापे, गरीब पाहुण्याच्या नावावर कोट्यावधींची रक्कम

Sangli Crime: प्रियकराच्या मदतीने २२ वर्षीय पत्नीने झोपेतच पतीला संपवलं; आधी प्रेमविवाह, नंतर दुसऱ्यावर जडला जीव, आता बाळासोबत कोठडीत

'वर्षभरापासून वेगळे राहतोय...' गौरव खन्नाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'आम्ही घटस्फोट घेतोय'

SCROLL FOR NEXT