truck Sakal
नाशिक

VIDEO : कोकणगावला अचानक लागलेल्या आगीत ट्रक भस्मसात

मुकूंद भडंगे

कोकणगाव (जि. नाशिक) : मुंबई - आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्याजवळील साकोरे फाट्यावर नादुरुस्त ट्रकला गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. याआगीत ट्रक जळून खाक झाला. सुदैवाने घटनेट कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. truck catch fire on mumbai agra highway nashik news

परिसरातील टोल नाक्यालगत असलेल्या साकोरे फाट्याजवळ पुष्ठ्याने भरलेल्या ट्रकने रात्री उशीरा शॉर्टसर्किट होऊन अचानक पेट घेतला असावा अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. असून एक वर्षांपूर्वी त्याच परिसरात पेट घेतलेल्या बर्निंग कारच्या थरारकची आठवण करून दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगावच्या टोल नाक्या परिसरातील कोकणगाव शिवारात असलेल्या साकोरे फाट्याजवळ पुष्ट्याने भरलेला एम.एच ०५ .१६११ पिंपळगाव कडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने प्राथमिक अंदाजा नुसार शॉर्टसर्किट होऊन पेट घेतला. घटनेची माहिती महामार्ग व पिंपळगाव पोलिस प्रशासनाला लागताच त्यांनी तात्काळ पिंपळगाव अग्निशामक प्रशासनाला घटनेची माहिती दिली असता तातडीने अग्निशामक प्रशासनाच्या चार ते पाच बंबाच्या वाहनासह अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व आणि सुरक्षित वाहनांना प्रवास मिळाला यासाठी महामार्ग पोलिस पथक व पिंपळगाव पोलीस प्रशासनाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग

वाहतुकीचा ‘नवा अध्याय’ लिहिला जाणार! गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे कोंडीतून दिलासा मिळणार! नवी मुंबई काही मिनिटांत गाठता येणार!

November 2025 Horoscope : नव्या आठवड्यात 'या' 3 राशींच्या लोकांचा होणार फायदाच फायदा..घरी येणार पैसा-गुडलक, तुमची रास आहे का?

Latest Marathi News Update : वर्ल्ड कप फायनलमध्ये शफाली वर्माचे अर्धशतक, स्मृती मानधनासोबत केली शतकी भागीदारी

SCROLL FOR NEXT