death  esakal
नाशिक

Nashik News : ट्रक चालकाचा मालेगावात उष्माघाताने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सूर्यनारायणाचा प्रकोप, उन्हाच्या वाढत्या झळा व वाढत्या तापमानामुळे शहर व परिसर अक्षरश: आग ओकत आहे. शहरात उष्माघाताचा शनिवारी (ता.१३) पहिला बळी गेला.

मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाट्यानजीकच्या सहयोग हॉटेलवर भोजनासाठी जात असलेल्या ट्रकचालकास अचानक चक्कर आली. (Truck driver died of heatstroke in Malegaon nashik news)

उपचारासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आज दुपारी हा प्रकार घडला. अकबर शाह मेहबूब शाह (वय ५३, रा. अकोला) असे या चालकाचे नाव आहे.

महामार्गावर आज दुपारी ट्रक थांबला असता अकबर जेवणासाठी जात असताना त्यांना अचानक चक्कर आली. सहयोग हॉटेलच्या चालकाने राहुल पाटील नामक रुग्णवाहिका चालकाला पाचारण करून त्यांना रुग्णालयात नेण्याची तयारी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वाढते तापमान व उन्हामुळे त्यांना भोवळ व चक्कर आल्याचे उपस्थितांनी सांगितले. शहरात गेल्या तीन दिवसापासून उष्णतेची लहर आली आहे. येथील तापमानाचा पारा सातत्याने ४३ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे.

तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख यांनी अकबर शाह यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती कळविली आहे. मृतदेह विच्छेदनासाठी येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT