truck at night 1.jpg 
नाशिक

थरारक! महामार्गावरील ट्रक थेट व्हायचे हायजॅक...पोलीसांकडून धक्कादायक खुलासा

विनोद बेदरकर

नाशिक : महामार्गावर ट्रक थेट हायजॅक व्हायचा. परप्रांतीय ट्रक व त्यातील वस्तूंची विल्हेवाट लावली जायची. या गोष्टीचा लवकरच पर्दाफाश होणार आहे. शोध घेताच पोलीसांनी खुलासा केला.

महामार्गावरील चालकांना मारहाण करून करायचा ट्रक गायब 

पेठ-गुजरात महामार्गावर ट्रक थेट हायजॅक व्हायचा. परप्रांतीय ट्रक व त्यातील वस्तूंची विल्हेवाट लावली जायची. या गोष्टीचा लवकरच पर्दाफाश होणार आहे. शोध घेताच पोलीसांनी खुलासा केला. रासेगाव शिवारात २० जुलैला बारा साखळा डोंगराजवळ रात्री माल ट्रक (केए ५६, १९४५) अडवून ट्रकचालक अनिलकुमार बॅनर्जी (रा. संगवळणी, जि. बीदर, कर्नाटक) घेऊन जात असताना ट्रकला सफेद रंगाची कार आडवी करून त्यास व क्लीनरला गाडीच्या केबिनमधून खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून संशयितांनी ट्रक कॉटनसह हायजॅक केला होता. या प्रकरणी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक व मुद्देमाल असा २३ लाखांचा मुद्देमाल जबरीने लुटल्याचा दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

जबरी लूटमारीचे तीन गुन्हे उघडकीस

संशयित अझहर खान ऊर्फ अज्जूची चौकशी करीत पोलिसांनी रासेगाव शिवारातून चालक व क्लीनरला मारहाण करून हायजॅक केलेला ट्रक हस्तगत केला आहे. तसेच अझहर खान व त्याच्या साथीदारांनी मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक हायजॅक करून गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. दिंडोरी, देवळा व कसारा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जबरी लूटमारीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

साथीदारांचा तपास सुरू

पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली टोयोटा ईटिका (एमएच ३, बीई ३८२) ही गाडी हायजॅक केलेला ट्रक (केए ५६, १९४५) झोडगे  शिवारात जप्त केला. संशयितांनी ट्रकमधील १५ लाखांचे ४०९ कॉटनचे बंडल व ट्रक असा सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. महामार्गावरील गुन्हे करणाऱ्या सराईत अझहर खान व त्याच्या काही साथीदारांचा तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक के. के. पाटील यांच्या पथकाने मालेगाव शहरातील देवीचा मळा परिसरात सापळा रचून अझहर खान वाजीद खान ऊर्फ अज्जू (वय ३०, रा. उमराबाग, देवीचा मळा, मालेगाव) याला अटक केली. 

टोळीचा पर्दाफाश होणार

पेठ-गुजरात मार्गावर रासेगाव शिवारातून कर्नाटकमधील ट्रक अडवून तो पळवून न्यायचा. परप्रांतीय ट्रक व त्यातील वस्तूंची विल्हेवाट लावणारी त्यांची टोळी आहे. अखेर पोलिसांनी त्याला शोधलाच, मालेगाव  येथील अझहर खान वाजीद खान (वय ३०) मालेगावला सापळा लावून अटक केली. त्यामुळे आता लवकरच महामार्गावर परप्रांतीय ट्रक अडवून चालक, क्लीनरला मारहाण करीत ट्रक गायब करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होणार आहे. 

रिपोर्टर - विनोद बेदरकर

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT