HIV-TAP.jpg 
नाशिक

संयम सुटला! बेशिस्त पॉझिटिव्ह रुग्णांला कंटाळून..तब्बल २६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी वाचा काय केले?

सकाळवृत्तसेवा

नाशिक : इमारतीत क्वारंटाइन केलेल्यांपैकी काही कोरोनाबाधित कर्मचारी रुग्णालयात दाखल आहेत. या सगळ्यांचा काही दिवसांपासून डोकेदुखीचा विषय झाला आहे. उघडपणे फिरणारे हे कोरोनाबाधित ऐकत नाहीत, हे सगळ्यांचे दुखणे आहे

काय घडले नेमके?
शालिमार येथील संदर्भसेवा रुग्णालयाच्या आवारात जिल्हा हिवताप, हत्तीरोग यांसह आरोग्य विभागाची विविध कार्यालये आहेत याच इमारतीत कर्मचारी राहतात, हे कमी की काय म्हणून रिकाम्या खोल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दिल्या आहेत. कोरोनाच्या दरम्यान अनेक कंत्राटी कामगार कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यांना याच इमारतीत तीन खोल्यांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले. साहजिकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासामुळे ही इमारत महत्त्वाची बनली आहे. पण क्वारंटाइन केलेले पॉझिटिव्ह कंत्राटी कामगार क्वारंटाइन राहण्यापेक्षा बिनदिक्कत परिसरात फिरू लागल्याने संदर्भसेवा रुग्णालयासह आरोग्य विभागाच्या विविध कर्मचाऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण बेफिरीकरणपणे फिरतात, त्यांना हटकले तरी उपयोग होत नाही. ते ठेकेदार सोडून इतर कुणाचेही एकत नाही. त्यामुळे सगळा आरोग्य विभागाचा कॅम्पसच धोक्यात आला आहे. 

कर्मचारी आठवडाभर रजेवर

जिल्हा आरोग्य विभागाच्या संदर्भसेवा रुग्णालयातील इमारतीत पॉझिटिव्ह रुग्ण क्वारंटाइन केले आहेत. मात्र संबधित पॉझिटिव्ह रुग्ण बिनधास्त निष्काळजीपणाने वसाहतीत खुलेआम फिरत असल्याने त्यांच्या निष्काळजीपणाला कंटाळून २६ आरोग्य कर्मचारी आठवडाभर रजेवर गेले आहे.

संयम सुटला 
इमारतीत क्वारंटाइन केलेल्यांपैकी काही कोरोनाबाधित कर्मचारी रुग्णालयात दाखल आहेत. या सगळ्यांचा काही दिवसांपासून डोकेदुखीचा विषय झाला आहे. उघडपणे फिरणारे हे कोरोनाबाधित ऐकत नाहीत, हे सगळ्यांचे दुखणे आहे. गेल्या  काही दिवसांपासून समजावून थकलेले हत्तीरोग, हिवताप व इतर विभागांतील त्रस्त कर्मचारी आज आक्रमक झाले. त्यांनी थेट  आठवडाभराच्या रजेसाठी सामूहिक रजेचा अर्ज केला. आजपासून थेट २४ जुलैपर्यंत सगळे कर्मचारी रजेवर गेले आहेत.

(संपादन - ज्योती देवरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT