A team of the city crime branch's unit one with the duo flashing deadly weapons on Instagram. esakal
नाशिक

Nashik Crime News: Instagramवर रिल्स बनवून चमकोगिरी पडली महागात! घातक हत्यारांसह दोघांना अटक

नरेश हाळणोर

नाशिक : सोशल माध्यमांवर घातक हत्यारांसह रिल्स बनवून चमकोगिरी करणे दोघा तरुणांना चांगलीच महागात पडली आहे. या दोघांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने हत्यारांसह अटक केली आहे. (Two arrested for Making reels on Instagram with deadly weapons Nashik Crime News)

फैजान नईम शेख (१९, रा. भारतनगर), सचिन शरद इंगोले (२८, रा. भारतनगर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. शहर गुन्हेशाखा युनिट एकचे कर्मचारी मुक्तार शेख यांना संशयित तरुण इन्स्ट्राग्रामवर घातक हत्यारांसह रिल्स बनवून चमकोगिरी करीत असल्याची माहिती मिळाली.

यासंदर्भात शेख यांनी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सांगितले असता, पथकाने भारतनगरमधून संशयित फैजान शेख यास ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडून स्टीलची धारदार तलवार जप्त करण्यात आली.

हत्यारांबाबत चौकशीत त्याने संशयित सचिन इंगोले याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी संशयित इंगोले यास अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी धारदार लोखंडी गुप्ती जप्त केली.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदिप म्हसदे, नाझीम खान पठाण, शरद सोनवणे, आसिफ तांबोळी, प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके आदि उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT