Actress Archana Nipankar, District Collector Gangatharan while inaugurating Pushpotsav 2023. D, Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar and Adhikari. esakal
नाशिक

NMC Flower Festival : पुष्पप्रेमींना दोनदिवसीय मेजवानी; महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेतर्फे आयोजित पुष्पोत्सवाचे उद्‌घाटन सिनेअभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २४) झाले. जिल्हाधिकारी गंगाथरन. डी या वेळी प्रमुख पाहुणे होते. जिल्हाधिकारी म्हणाले, की महापालिकेकडून अशा पद्धतीने पुष्पोत्सव भरविला जात असल्याचे प्रथमच पाहत आहोत.

या पुष्पोत्सवातून फुलांचे महत्त्व समजते. म्हणून हा चांगला उपक्रम असून नागरिकांनी लाभ घ्यावा. (two day feast for flower lovers Inauguration of NMC Flower Festival nashik news)

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, की नाशिक शहर व परिसरातील वातावरण निसर्ग रम्य आहे. पुष्पोत्सवास प्रतिसाद कसा मिळेल, यावरुन विचार सुरु होता मात्र नाशिककरांनी लावलेली उपस्थिती यामुळे आनंद होतो आहे.

पुष्पोत्सवातून नागरिकांमध्ये फुलांविषयी प्रेम वाढावे पर्यावरणाविषयी अनास्था वाढत असून ते चिंताजनक आहे. उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंढे म्हणाले, पुष्पोत्सव साजरी करताना स्वच्छ नाशिक, हरित नाशिक व फुलांचे नाशिक असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

पुष्पोत्सव या वर्षी जोमाने साजरी करीत आहोत. नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विजया दुधारे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

हे आहेत मुख्य आकर्षण

मिनी एचर लॅन्डस्केपींग, कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर विविध गटाची मांडणी, विविध गटामध्ये गुलाबपुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवल्या आहेत. शनिवार व रविवार दोन दिवस हे पुष्प प्रदर्शन नागरीकांना पुष्प पर्वणीचा लाभ घेता येणार आहे. सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत वेळेत प्रदर्शन पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT