heavy rain in nashik  Sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात आज, उद्या अतिवृष्टीचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : मुंबई येथील प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 24 ते 28 सप्टेंबर या दिवसांत नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासह काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी 28 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीच्या काळात खबरदारी बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 27 व 28 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदी-नाले काठच्या परिसरातील लोकांनी सतर्क राहावे. तसेच नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये, त्याचप्रमाणे आपले पशुधन, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत. अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT