BJP esakal
नाशिक

BJP Statewide Meeting : विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक, केंद्र व राज्याचे मंत्रिमंडळाची उपस्थिती

विक्रांत मते

नाशिक : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर त्या बैठकीच्या विचारातून बाहेर पडलेले मंथन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्या बरोबरचं आगामी निवडणुकांसाठी व्यूहरचना आखण्यासाठी नाशिक मध्ये दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपूर येथील डेमॉक्रसी हॉटेल येथे बैठक होईल. भाजपचे केंद्रातील महाराष्ट्राचे मंत्री व राज्यातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहतील.

अशी माहिती प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांनी दिली. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, बाळासाहेब सानप, विजय साने, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सुनील केदार आदी उपस्थित होते. (Two day meeting of BJP state executive presence of central and state cabinet Assembly and local body elections Nashik political News)

शुक्रवारी (ता.१०) संध्याकाळी निमंत्रितांची बैठक होईल. शनिवारी (ता. ११) प्रदेश कार्यकारिणी बैठक होईल. निमंत्रितांची बैठकीसाठी २०० पदाधिकारी उपस्थित राहतील तर कार्यकारिणी बैठकीत सातशे पदाधिकारी उपस्थित राहतील.

शनिवारी सकाळी १० वाजता बैठकीचे उदघाटन होईल. त्यानंतर पक्ष संघटनात्मक बांधणीवर चर्चा होईल. दुपारच्या सत्रात राजकीय, कृषी व सहकार याविषयावरील प्रस्तावांवर चर्चा होईल. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल भाजप सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला जाईल. सायंकाळी ५ वाजता बैठकीचा होईल.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

धन्यवाद मोदीजी वर भर

आगामी निवडणुकांसाठी पुन्हा एकदा मोदी ब्रॅण्डचा समोर आणला जाणार असल्याचे राज्यव्यापी बैठकीतून समोर आले आहे. केंद्र सरकारने राबविलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मानले जाणार आहे.

त्याचबरोबर भवन निर्माण, लोकसभा प्रवास, स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, फ्रेण्डस ऑॅफ बीजेपी, एक मंत्री एक दिवस एक विद्यापीठ, नवमतदार नोंदणी, युवा वॉरिअर्स, डेटा मॅनेजमेंट व उपयोग, जी-२० परिषद, आर्थिक विकासाची दिशा, सोशल मिडियाच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचा प्रसार आदी विषयांवर चर्चा होईल.

मोदी, शाह, गडकरींचा दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता. १०) मुंबईत येणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा वरिष्ठ नेते नाशिकमध्ये दाखल होतील. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर सभेद्वारे बैठकीचा समारोप करण्याचे नियोजन होते,

परंतु ईशान्य राज्यांच्या निवडणूक प्रचारानिमित्ताने त्यांचा नाशिक दौरा रद्द झाला तर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यासंदर्भातही अनिश्चितता असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Paithan News : पैठणमध्ये नगर पालिका निवडणुकीआधी जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार; महिला उमेदवाराच्या घरासमोर अघोरी साहित्य!

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

SCROLL FOR NEXT