two floored house set on fire in satana Millions of rupees worth goods burnt Nashik News esakal
नाशिक

दुमजली घराला आग; लाखो रूपयांचे साहित्य, संसारोपयोगी वस्तू जळाल्या

अंबादास देवरे

सटाणा (जि. नाशिक) : मुंजवाड (ता. बागलाण) येथील एका व्यावसायिकाच्या दुमजली घरास बुधवारी (ता. १) रात्री आग लागली (Fire accident). आगीत वरचा संपूर्ण मजला जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचे साहित्य, संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. शेजाऱ्यांनी समयसूचकता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. सटाणा पालिकेचा अग्निशमन दलाचा बंब वेळेवर घटनास्थळी दाखल झाल्याने ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न चालले होते. आग आटोक्यात आल्यावर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

मुंजवाड येथील श्रीराम मंदिराशेजारी दगडू पांडूरंग भामरे याचे दुमजली निवासस्थान आहे. तेथेच त्यांचे कापड दुकान व लग्न समारंभांना गादी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी (ता. १३) रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान घराच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली. त्यांच्या घरासमोरच रहाणारे पोपट जगदाळे यांना भामरे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे दिसताच त्यांनी आजूबाजूच्या नागरीकांसह दगडू भामरे यांना झोपेतून उठवले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. ग्रामस्थांच्या मदतीने सटाणा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. यात ७० गाद्या, ताडपत्री, पट्टया, रेडीमेड कपडे, धान्य संपूर्ण जळून खाक झाले होते.

सुदैवाने या घटनेत खालच्या मजल्यात आग न पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. दुसऱ्या दिवशी आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. आमदार बोरसे यांना भामरे यांना वैयक्तिक पाच हजार रुपयांची मदत दिली. मुंजवाडच्या सरपंच प्रमिला पवार यांनीही भामरे यांना २१०० रुपयांची आर्थिक मदत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

...तोपर्यंत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, बाळ्या मामांचा सरकारला इशारा, नेमकी अट कोणती?

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Yermala Crime : राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या वाहन लुटीच्या व्हायरल व्हिडीओ नंतर, स्थानिक गुन्हे शाखेला जाग

SCROLL FOR NEXT