nurse corona.jpg 
नाशिक

जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे दोन तास कामबंद आंदोलन; 'या' आहेत मागण्या 

विक्रांत मते

नाशिक : कोविड रुग्णालयात कार्यरत परिचारिकांना आवश्यक विविध सुविधा व मागण्यांसाठी जिल्हा, तसेच राज्यभरातील परिचारिकांनी बुधवारी आंदोलन केले. नाशिकला जिल्हा रुग्णालयात झालेल्या आंदोलनात परिचारिकांनी शासनाचा निषेध करीत, दोन तास कामबंद ठेवले. 

दोन तास कामबंद आंदोलन
जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी (ता. २६) सकाळी सर्व परिचारिकांनी घोषणाबाजी केली. मागण्या पूर्ण करण्याची मागणी करत शासनाचा निषेध नोंदविला. त्यानंतर तर दोन तास कामबंद आंदोलन केले. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना निवेदन दिले. कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांना सात दिवस काम व सात दिवस क्वारंटाइन करावे. कोविड रुग्णालयात पीपीई किट घालून आठ तसा काम करणे त्रासदायक होत असल्याने पीपीई किट घातल्यानंतर चार तासांचे काम असावे, कोविड रुग्णालयासाठी परिचारिकांची भरती करावी, बाहेरगावच्या परिचारिकांच्या राहण्याची व्यवस्था करावी.

पीपीई किट घालून आठ काम करणे त्रासदायक

मुंबईप्रमाणे कोविड रुग्णालयात कार्यरत परिचारिकांना ३०० रुपये दररोजचा भत्ता दिला जावा. पीपीई किटसह सर्व साधनसामग्री उच्च दर्जाची व पुरेशा प्रमाणात मिळावी, कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांची सातत्याने स्वॅब तपासणी करावी. त्यांच्यासाठी २० टक्के खाटा रिक्त ठेवाव्यात, कोविड रुग्णालयात काम करताना परिचारिकेचा मृत्यू झाल्यास तत्काळ ५० लाखांचा विमा तिच्या कुटुंबीयांना मिळावा, बंधपत्रित व प्रभारी परिचारिकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा पूजा पवार, कार्याध्यक्षा सीमा टाकळकर, सरचिटणीस कल्पना पवार, लता परदेशी, शोभा सोनवणे, विशाल सोनार आदींसह परिचारिका सहभागी झाल्या.  

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT