accident brother.jpg 
नाशिक

भयावह! बाईकवरून सुसाट जाताना..अचानक बाजूच्या धावत्या कारचा दरवाजा उघडला...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक रामअशिष जयस्वाल (19, रा. एकलहरे जकात नाका, त्रिमूर्तीनगर, नाशिक रोड) व त्याचा मावसभाऊ बिपिन जयस्वाल हे दोघे दुचाकीवरून (एमएच 15 एफझेड 7942) सिन्नर फाट्याकडे येत होते. अभिषेकने हेल्मेट घातलेले होते. ते चेहेडी शिव येथील प्रेस्टीज पॉइंट कॉलनीच्या गेटसमोर आले असता, त्यांच्या पुढे असणाऱ्या कारचा (एमएच 15 एफएफ 7146) संशयित कारचालक भालचंद्र पोपटराव शिरसाठ (रा. गंगापूर रोड) याने अचानक धावत्या कारचा दरवाजा उघडला असता जे काही झाले ते भयावह होते.

पुणे महामार्गावरील घटना...

बिपिन रामप्रताप जयस्वाल असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक रामअशिष जयस्वाल (19, रा. एकलहरे जकात नाका, त्रिमूर्तीनगर, नाशिक रोड) व त्याचा मावसभाऊ बिपिन जयस्वाल हे दोघे दुचाकीवरून (एमएच 15 एफझेड 7942) सिन्नर फाट्याकडे येत होते. अभिषेकने हेल्मेट घातलेले होते. ते चेहेडी शिव येथील प्रेस्टीज पॉइंट कॉलनीच्या गेटसमोर आले असता, त्यांच्या पुढे असणाऱ्या कारचा (एमएच 15 एफएफ 7146) संशयित कारचालक भालचंद्र पोपटराव शिरसाठ (रा. गंगापूर रोड) याने अचानक धावत्या कारचा दरवाजा उघडला असता, त्या दरवाजाचा धक्का अभिषेकच्या दुचाकीला बसला. त्यामुळे दुचाकीवरून अभिषेक रस्त्यावर पडला तर त्याच्या पाठीमागे बसलेला बिपिन जयस्वाल शेजारून धावणाऱ्या ट्रकच्या (एमएच 48 एआर 1169) मागील चाकाखाली सापडून चिरडला गेला. त्यामुळे तो जागीच ठार झाला. तर अभिषेकही गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (ता. 2) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी कारचालक शिरसाठ याच्याविरोधात नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक एन. जे. कंडारे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT