Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : आंबानेर फाट्यावर पिकअपने दुचाकीस दिलेल्या धडकेत दोघे ठार

वणी - सापूतारा रस्त्यावर अंबानेर फाट्यानजिक पिकअपने दुचाकीस दिलेल्या धडकेत सुरगाणा तालुक्यातील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वणी : वणी - सापूतारा रस्त्यावर अंबानेर फाट्यानजिक पिकअपने दुचाकीस दिलेल्या धडकेत सुरगाणा तालुक्यातील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहे. अपघातानंतर दुचाकीने पेट घेवून दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहेत. (Two killed in collision between pickup and two wheeler on ambaner Phata Nashik Accident News)

याबाबत माहती अशी की, गुरुवार, ता. १ रोजी सांयकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेत मजुरीचे काम करणारे दयाराम चिम महाले, वय ३० रा. महालपाडा गुही, ता. सुरगाणा व जयवंत शांताराम बंगाळ - बंगाळपाडा गुही, ता. सुरगाणा हे मोटरसायकने नाशिकहून धार्मिक कार्यक्रमासाठी घरी महालपाडा येथे जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणारी पिकअप क्र. एम एच ४१ अे यु ६६१९ हीने जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यु झाला. तर अपघातग्रस्त दुचाकीने पेट घेवून जळून खाक झाली.

मृतांना वणी ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून रात्री उशिरा वैद्यकिय अधिकारी डॉ. सिंगल व डॉ. गाडे यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान वणी पोलिसांत पिकअप चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीवरील मयत दोघे हे नाशिक येथे कंपनीत कामाला आहे. ते उद्या ता. २ रोजी घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने घरी जात असतांना दोघा तरुणांवर काळाने घाला घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT