Chain Snatching Crime esakal
नाशिक

Nashik Crime: चहाविक्रेत्या महिलेची पोत खेचणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या; ग्रामीण पोलिसांच्या गुन्हेशाखेची कामगिरी

दोघा संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्याकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गिरणारे रोडवरील हॉटेल गंमत-जमंत येथे चहाच्या टपरी चालविणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून देणाऱ्या दोघांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.

दोघा संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्याकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. (two men chain snatched tea vendor arrested by Crime Branch of Rural Police Nashik Crime)

सागर दिनकर देवरे (२४, रा. शिल्पा आनंद सोसायटी, शिवाजीनगर, नाशिक), चंदर सिताराम फसाळे (२७, रा. लाडची, धोंडेगाव, ता. जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

गेल्या रविवारी (ता.११) दुपारी छबुबाई वाघ (५५) या त्यांच्या चहाचे टपरीवर त्यांच्या मुलाशी फोनवर बोलत असतांना मोटर सायकलवरून आलेल्या अज्ञात दोघांपैकी मागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळयातील ३५ हजारांची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांने केलेल्या वर्णनानुसार तपास सुरू केला.

त्यानुसार, पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेत.चौकशी केली असता, त्यांनी सोनसाखळी चोरीची कबुली दिली. संशयितांकडून गुन्ह्यात चोरून नेलेली सोन्याची पोत व वापरलेली होन्डा शाईन मोटर सायकल असा ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी जिल्हा अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सायबरचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, गोरक्षनाथ संवस्तरकर, किशोर खराटे, प्रविण सानप, विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नंदु वाघ, शितल गायकवाड, परिक्षीत निकम, प्रमोद जाधव यांनी बजावली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT