Death News esakal
नाशिक

Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांच्या आत्महत्या

नरेश हाळणोर

नाशिक : अंबड आणि देवळाली कॅम्प परिसरात दोघांनी अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्त्या केल्या. (Two suicides in different incidents Nashik News)

उमेश दगा धामणे (रा. साईभूमी रो हाऊस, शुभम पार्क, उत्तमनगर) यांच्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी (ता. २०) दुपारच्या सुमारास त्यांची वहिणी मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी भाऊ निलेश दगा धामणे (३६) हे घरातच होते. त्या परत आल्या असता घराचा दरवाजा उघडत नसल्याने मुलांनी उमेश यांना बोलाविले.

त्यावेळी घराची खिडकी तोडून आत प्रवेश केला असता निलेश यांनी किचनरुममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर, दुसरी घटना शिंगवेबहुला येथे घडली. गंगाधर पांडुरंग धोंगडे (५३) यांनी राहत्या घरात गेल्या मंगळवारी (ता. २०) दुपारी तीनच्या सुमारास गळफास लावून घेतला.

त्यांना उपचारासाठी कॅन्टोन्मेट रुग्णालात दाखल केले असता, वैदयकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole News: उन्हाच्या झळांनी घेतला जीव; अकोले तालुक्यातील शेतकरी कोसळून मृत, ४१ अंश तापमानात दुर्दैवी घटना..

Latest Marathi News Live Update : खोपोली पेण रस्त्यावर हायवा डंपरला लागली आग

रस्त्याच्या कामाच्या बिलावर २ टक्के मागणी, लाच घेताना ZP इंजिनिअरसह ३ अधिकाऱ्यांना अटक

Mahad Chavdaar Tale: इतिहास जागा झाला! चवदार तळ्यातील ११ विहिरींचे दर्शन, ऐतिहासिक लढ्याच्या साक्षीदारांना पाहण्यासाठी गर्दी..

Medical College: ‘सिव्हिल’ आता होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय: ४४८ पदांसाठी अध्यादेश, पुढच्या वर्षी पहिल्या बॅचचे ॲडमिशन

SCROLL FOR NEXT