bike Thief esakal
नाशिक

Nashik Crime News : शहर परिसरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहर - परिसरातून दुचाकी लंपास होण्याचे प्रकार अद्यापही थांबलेले नाही. शहराच्या विविध भागातून पुन्हा चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या असून, यातील एक दुचाकी तर शहर वाहतूक शाखेच्या पोलिस चौकीतूनच चोरट्यांनी लांबविली आहे. या घटनांमुळे वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उभा राहिला आहे. (Two wheeler thefts increased in city Nashik Crime News)

अरविंद त्र्यंबक कराटे (रा. हिरावाडी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, ते मंगळवारी (ता. १) गोदाघाटावर गेले होते. दुतोंड्या मारुतीजवळ दुचाकी पार्क केली असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी (एमएच- १५- एफए- ६१६९) चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विपुल धनंजय गांगुर्डे (रा. समृद्धी पार्क, काठेनगर, द्वारका) यांच्या फिर्यादीनुसार, २७ ऑक्टोबरला दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून त्यांची दुचाकी (एमएच- १५- सीजी- १०९६) अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

तर, गणेश शिवाजी करंजकर (रा. गजानन हाऊस, रासबिहारी लिंक रोड, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, ३० ऑक्टोबरला त्यांनी मेनरोडवरील विश्राम बाग कॉम्प्लेक्स येथे पार्क केलेली दुचाकी (एमएच- १५- एफएक्स- ४६५२) दुपारी एकच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या दोन्ही घटनेप्रकरणी भद्रकाली पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हेमंत काशिनाथ तुपलोंढे (रा. मखमलाबाद, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची दुचाकी (एमएच- १५- सीएन- ७८१२) ३१ ऑक्टोबरला मध्यरात्री पाथर्डी फाटा येथील वाहतूक पोलिस चौकी येथे पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT