Bike theft latest marathi news esakal
नाशिक

Nashik Crime News : दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट; शहरातून 5 दुचाकींची चोरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पोलिसांनी नाकाबंदी करूनही दुचाकी चोरीचे सत्र कायम असून, दुचाकी चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. पुन्हा पाच दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. श्याम धर्मा सोनार (रा. म्हसरूळ) यांची दुचाकी (एमएच- १५- एचपी- ६८९६) सोमवारी (ता. १९) मध्यरात्री राहत्या घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (Two wheeler thefts increasing in city 5 bikes stolen from city Nashik Crime News)

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

अनिकेत बाळू इंगळे (रा. गंगापूर रोड) यांनी गेल्या ३० ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास डोंगरे वसतिगृहाच्या मेनगेटसमोर दुचाकी (एमएच- १५- एचझेड- ९५४५) पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेत सतीश भोकरे (रा. पवननगर, सिडको) यांची दुचाकी (एमएच- १५- इजी- ६३६२) त्यांच्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शेखर बबन वेलजाळी (रा. देवळाली कॅम्प) यांची दुचाकी (एमएच- १५- एएन- ७६६४) नाशिक रोड गायकवाड कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये पार्क केली असता, सोमवारी (ता. १९) चोरी झाली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कैलास उत्तम आल्हाट (रा. जेलरोड) यांची दुचाकी (एमएच- १५- जीयू- १६११) १४ डिसेंबरला मध्यरात्री चोरी झाली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: जय शाहांकडून Lionel Messi ला टीम इंडियाची जर्सी भेट, T20 World Cup साठीही आमंत्रण; फुटबॉलचा बादशाह दिल्लीत काय म्हणाला?

Pune Fraud : "तुला 'एमबीबीएस'ला ऍडमिशन घेऊन देतो"; असं बोलून केली सव्वा कोटींची फसवणूक; पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

वर्षाच्या शेवटी अमृता खानविलकरची चाहत्यांना खास भेट! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार

Pune News : नागरिक सुरक्षेसाठी मोठे पाऊल; सिंहगड रस्त्यावर 'नऱ्हे पोलिस स्टेशनचे' दिमाखात उद्घाटन!

Latest Marathi News Live Update : जायगावला साकारणार जगातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन

SCROLL FOR NEXT