Seized Bikes
Seized Bikes esakal
नाशिक

Crime Update : सराईत दुचाकी चोरट्यास सिन्नरला अटक; 4 दुचाकी चोरल्याची कबुली

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी सिन्नर शहरातील आडवा फाटा परिसरात सापळा रचून एका सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली. त्याच्याकडून सिन्नर बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली असून आणखी तीन ठिकाणी दुचाकी चोरल्याची त्याने कबुली दिली आहे. (two wheeler thief arrested at Sinnar Nashik Latest Crime News)

दि 17 रोजी गोरख माणिक आळारे रा.भगुर हे सकाळी 7 वाजेच्या सुमारास हीरो होंडा मोटार सायकल क्र MH15/ BM 7555 ही सिन्नर बसस्थानक आवारात उभी करुन बसने बाहेरगावी गेले होते. ते परत आल्यानंतर दुचाकी चोरीस गेल्याचे आढळून आले होते याबाबत श्री.आळारे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सिन्नर शहर व परिसरात मागील अनेक दिवसांपासुन मोटारसायकली चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्याने सदर मोटारसायकल चोरीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत देखिल करण्यात येत होता. सोमवारी दि.19 गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार रविंद्र वानखेडे, शिपाई विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम यांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना खबऱ्याकडून प्राप्त माहितीप्रमाणे दुचाकी चोरीत सहभाग असलेल्या एका सराईत चोरट्याचा सिन्नर शहरात वावर असल्याचे सांगून त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले.

सायंकाळी ०७/३० वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक आडवा फाटा येथे तपासणी करत असताना संशयित चोरटा पथकाच्या जाळ्यात सापडला त्याच्या कडे असलेल्या मोटरसायकल बाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पथकाने त्याला पाहुणचारासाठी बाजूला घेतले. त्यानंतर त्याने स्वतःची खरी ओळख सांगत सदर मोटरसायकल सिन्नर बस स्थानक येथून चोरल्याची कबुली दिली.

नाशिक रोड, शिर्डी तसेच परभणी येथून देखील प्रत्येकी एक मोटरसायकल चोरल्याची त्याने कबुली दिली बालाजी विष्नु माने रा. संत गाडगेबाबा नगर , परभणी असे या दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याचेवर अगोदर देखील मोटारसायकल चोरी, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेतलेल्या दुचाकीसह त्याला पुढील कारवाईसाठी सिन्नर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT