Vitthal devotees from the state settled in Dubai during Ashadhi Ekadashi celebrations in UAE. esakal
नाशिक

UAE Ashadhi Ekadashi: दुबईत रंगला विठूनामाचा गजर! यूएईमधील श्री गणेश मंडळ, शारजाह मंडळाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

UAE Ashadhi Ekadashi : राज्यात आषाढी एकादशीनिमित्त हरिनामाचा गजर करीत होणाऱ्या दिंडी सोहळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. सातासमुद्रापारही विठुरायाच्या भक्तांनी यूएईमध्ये भावपूर्ण वातावरणात आषाढी महोत्त्सव साजरा केला.

आषाढी सोहळ्यामुळे संपूर्ण यूएई विठ्ठलमय झाली होती. यूएईमधील श्री गणेश मंडळ, शारजाह मंडळाने याकामी पुढाकार घेतला. (UAE Ashadhi Ekadashi vithu mauli in Dubai Initiative of Shree Ganesha Mandal Sharjah Mandal nashik)

दुबई येथील जे.एस.एस. प्रायव्हेट स्कूल, येथे आषाढी एकादशीचा हा सोहळा पार पडला. २०१६ पासून सुरू केलेला आषाढी एकादशी सोहळा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दुबईत आषाढी एकादशी साजरी करण्यात आला.

यूएईमध्ये असणाऱ्या मराठी माणसांच्या हृदयात आषाढी वारीची ओढ लागलेली असते. पालखीची सजावट, दिंडी, रिंगण, पखवाज, पारंपरिक पोशाख आणि टाळांच्या तालावर हरिपाठ, अभंग तसेच माउलींचा गजर, ज्ञानबा तुकारामांचा जयघोष अशा जल्लोषमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भाविकांनी फुगड्या आणि भक्तिनृत्य केले. श्री गणेश भजन मंडळामुळे नोकरीनिमित्त परदेशात वास्तव्य असताना आपण महाराष्ट्रात विठुरायाच्या पंढरीतच असल्याचा अनुभव सगळ्यांना आला.

सगळ्यांनी या सोहळ्याद्वारे यूएई सर्वधर्मीय देश असल्याचा अनुभव घेतला. युएईमध्ये ४५ अंश तापमान असूनसुद्धा बहुसंख्य वारकरी मंडळी जमली होती.

पाच तास चाललेल्या भक्तिमय सोहळ्यात सर्व भक्तांना, लहान मुलांना उपवासाचे पदार्थ, फळे आदी प्रसाद वाटप करण्यात आला. सोहळ्यासाठी श्री गणेश भजन मंडळ, शारजाह आणि आषाढी दिंडी ग्रुपमधील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT