Uddhav Thackeray ordered Badgujar to give victory to Shiv Sena in the municipal election 
नाशिक

महापालिकेवर भगवा फडकवा! बडगुजर यांच्या भेटीत उद्धव ठाकरेंचा आदेश 

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : सर्व शिवसैनिकांना एकत्र घेऊन नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार करा आणि कामाला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे भेटीला आलेल्या नाशिकमधील नवनिर्वाचित महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर व उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला. 

ठाकरे यांच्या आदेशाने उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये नवसंचार निर्माण झाला. 
शिवसेनेच्या नाशिक महानगरप्रमुखपदी निवड होताच प्रथमच सुधाकर बडगुजर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबई येथे पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली. ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना एकत्र येऊन नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्याचे आदेश दिले. उपस्थित सर्वांनी नाशिक महापालिकेवर भगवा फडकवणार असल्याचे आश्वासन दिले. संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, राजू लवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक महापालिका निवडणुकीत भगवा फडकवणार असल्याचे आम्ही त्यांना शब्द दिला. 
-सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT