All India Marathi Publishers Association, Nashik Branch and Kusumagraj Foundation, 4th Writer-Publisher Literary Conference organized by Special Public Prosecutor Ujwal Nikam, Reception President Vishwas Thakur. esakal
नाशिक

Ujjwal Nikam : सेवानिवृत्त न्यायाधीशांची राजकीय पदांवर नेमणूक नको : उज्ज्वल निकम यांचे मत

सकाळ वृत्तसेवा

Ujjwal Nikam : सेवानिवृत्त न्यायाधीशांची कुठल्याही राजकीय हेतूने प्रेरित पदांवर नेमणूक व्हायला नको.

राजकीय पक्षांनी तसा प्रस्ताव ठेवला तरी न्यायाधीशांनी स्वतः त्याला विरोध केला पाहिजे, असे परखड मत मांडत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सर्वसामान्य व्यक्तींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढविण्यासाठी न्यायव्यवस्थेने पारदर्शकता दाखविली पाहिजे, असे आवाहनही केले. (Ujjwal Nikam statement opinion Retired judges should not be appointed to political posts nashik news)

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आयोजित चौथे लेखक, प्रकाशक साहित्य संमेलनात रविवारी (ता. ७) त्यांची मुलाखत घेण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी विशेष शैलीत ही मुलाखत घेतली.

या वेळी अॅड. निकम आपला जीवनप्रवास उलगडताना म्हणाले, माझ्या आईला वाटत होते, की मी डॉक्टर व्हावे आणि वडिलांना वाटे, की वकील व्हावे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी दोन गुण कमी पडले म्हणून वकील होण्याचा निर्णय घेतला.

मराठी माध्यमाच्या शाळेत आणि विज्ञान शाखेचा विद्यार्थी असतानाही मराठीतील ऐतिहासिक कादंबऱ्या वाचनाची मला आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात कविता लिहिण्याचा छंद लागला, तो संतापाने. पण त्या कधी प्रसिद्ध केल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

जगभरात गाजलेल्या खटल्यांपैकी मुंबई अतिरेकी हल्ल्यातील अजमल कसाब या गुन्हेगाराला फासावर लटकवले, अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा या प्रचलित खटल्यांचा त्यांनी थोडक्यात घटनाक्रम सांगितला.

कोल्हापूर न्यायालयाने बालगुन्हेगार असलेल्या रेणुका व सीमा गावित यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर काही लहान मुले साखर वाटत असल्याचा आनंद आजही स्मरणात असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य व्यक्तींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता अॅड. निकम म्हणाले, सर्वसामान्य व्यक्तींना चर्चेतून, बातम्यांमधून किंवा त्यांना दाखविण्यात येणाऱ्या गोष्टींमधून माहिती मिळत असते.

त्यातून ते आपले मत तयार करतात. स्वतःचे स्वतंत्र विचार मांडत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींचा न्यायवस्थेवरील विश्वास कमी होत असल्यास ही निश्चितच धोक्याची घंटा आहे. न्यायव्यवस्थेने पारदर्शकता दाखविली पाहिजे.

त्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची राजकीय हेतूने प्रेरित नेमणुका व्हायला नको. अशा नेमणुका होत असल्यामुळेच न्यायव्यवस्थेविरुद्ध प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. रॅपिड फायरच्या माध्यमातून विश्वास ठाकूर यांनी अॅड. निकम यांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

राजकारणात येण्याची विचार नाही

राज्यातील सध्याचे अस्थिर राजकीय परिस्थिती आणि घडामोडींमुळे राजकारणात येण्याच्या संदर्भात कुठलाही विचार केलेला नसल्याचा खुलासा अॅड. उज्ज्वल निकम यांनी केला. तसेच राज्यातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल, असे भाविकीतही त्यांनी वर्तविले आहे.

अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले...

- आयुष्यात प्रत्येकाला संधी मिळते, त्याचे सोने करता आले की यश निश्चितपणे मिळते

- अबू सालेम याने दीड पानांचे पत्र पाठवून तब्येतीची विचारपूस केली

- अजमल कसाब मला ‘बादशहा’ म्हणायचा

- २६/११ हल्ल्याचा खटला हा लाइव्ह चालविण्याचा जगातील पहिला खटला

- अडीच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीची ऑफर होती; पण राजकारणात येण्याचा विचार नाही

- माझा जन्म हनुमान जयंतीला झाल्यामुळे गुन्हेगारांची भीती वाटत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT