Unannounced load shedding of electricity in panchavati nashik news esakal
नाशिक

Nashik Electricity Problem: ऐन दिवाळीत पंचवटी परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Electricity Problem: दिपावली सणानिमित्त वीज पुरवठा सुरळीत राहील असे महावितरणने जाहीर केले होते. मात्र, पंचवटीतील मखमलाबाद, आडगाव शिवारात सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होत असल्याचे समोर आले आहेत.

यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांना अघोषित भारनियमनाला सामोरे जावे लागत असून वीजेचा लपंडाव सुरू आहे. (Unannounced load shedding of electricity in panchavati nashik news)

पंचवटीतील मखमलाबाद, आडगांव या परिसरातील अनेक भागात सातत्याने वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या अघोषित भारनियमनामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. मखमलाबाद परिसरातील अनेक कॉलनी भागात दोन दिवसांपासून सकाळ व सायंकाळी लाईट नसल्याने व्यावसायिकांना तसेच नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या.

मखमलाबाद परिसरातील रामकृष्ण नगर, शांती नगर, गामणे मळा, पार्थ कॉलनीसह अनेक ठिकाणी दररोज रात्री १ वाजेच्या सुमारास २ ते ५ मिनिट वीज पुरवठा खंडित होत असतो. परंतु ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पहाटे जवळपास दोन तास तर रात्री जवळपास दिड ते दोन तास वीज पुरवठा खंडित झाला होता.

या वीज पुरवठा खंडित बाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आलेली नव्हती. तसेच काही तांत्रिक कामामुळे जर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित झाला असेल किंवा होणार असेल तर त्याचा ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर मेसेज येतो. परंतु कोणत्याही प्रकारचा मेसेज न देता महावितरणकडून अशा रात्री मध्यरात्रीच्या अघोषित भारनियमनामुळे परिसरात अनेक चोरीच्या घटना घडत आहे.

या महावितरणच्या भोंगळ कारभाराविषयी नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सणांच्या दिवसात जर महावितरणकडून शहरातील विशिष्ट परिसरात असे अघोषित भारनियमन केले जात असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT