Sanjay Awhad & Vijay Awhad
Sanjay Awhad & Vijay Awhad esakal
नाशिक

Nashik News : नाशिक- पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात काका- पुतणे अपघातात ठार

प्रकाश शेळके

नाशिक : नाशिक पुणे महामार्गावर आज सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान माळवाडी येथील संजय विठोबा आव्हाड वय 50 व विजय शिवाजी आव्हाड वय 24 दोघे राहणार माळवाडी शिवाजीनगर बेगेवाडी हे दोघे चुलते पुतणे सिन्नर येथून घरी परतत असताना घराजवळच वळणावर आल्यानंतर सिन्नरच्या बाजूने येणाऱ्या ट्रक क्रमांक Mh19z 564 ह्या गाडीने मोटरसायकल क्रमांक Mh15 ce7427 ह्या दुचाकी स्प्लेंडरला धडक दिली. सदरचा ट्रक चालक अपघात ग्रस्त ट्रक सोडून फरार झाला.

मात्र मोटरसायकल वरील दोघेही चुलते पुतणे सदरच्या अपघातात जास्त मार लागल्यामुळे ठार झाले. हा प्रकार समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेऊन अपघातातील जखमींना तातडीने सिन्नर येथे उपचारासाठी नेले मात्र दोघांची प्राणज्योत मालवली होती. (Uncle nephew killed in accident at Malwadi area on Nashik Pune highway nashik Latest Marathi News)

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

सदरच्या अपघाताची माहिती कळताच संपूर्ण माळवाडी गावावर शोककळा पसरली. अपघातामुळे एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे सदरच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला असून संजय आव्हाड यांच्या पश्चात दोन मुले, मुली, भाऊ, आई-वडील, पुतणे असा परिवार असून पुतण्या विजय आव्हाड याचेही एका वर्षापूर्वीच लग्न झालेले आहे.

सदरच्या अपघाताने आव्हाड कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे. सदरच्या गटाची माहिती मिळताच नांदूर पोलिसांनी जागेवर जाऊन पंचनामा केला असून, अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नांदूर पोलीस स्टेशनचे प्रवीण अडांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT