death by drowning latest marathi news esakal
नाशिक

Nashik : स्वीमिंग टँकमधून बुडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नरेश हाळणोर

नाशिक : आपल्या जुळ्या मुलांचा वाढदिवस पर्यटनस्थळी साजरा करण्यासाठी लोणावळ्यात गेलेल्या नाशिकच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. या कुटुंबाचा दोन वर्षांचा चिमुकला हॉटेलमधील स्वीमिंग टँकमध्ये बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू (Death by Drowning) झाला. या प्रकरणी लोणावळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. (Unfortunate death of child after drowning in swimming tank at lonavala nashik Latest Marathi News)

शिवबा अखिल पवार (वय २, रा. बोधलेनगर, नाशिक) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. बुधवारी (ता. १३) पवार कुटुंबीय त्यांच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळा येथे गेले होते.

हॉटेलमध्ये पोचल्यानंतर पवार हे चेक इन करीत असतानाच त्यांचा २ वर्षांचा शिवबा हा नजरचुकीने हॉटेलच्या परिसरातील स्वीमिंग टँकच्या दिशेने गेला. टँकमधील खेळणी बघून तो पुढे जात असताना पाण्यात पडला.

या वेळी टँकजवळ कोणीही नसल्याने त्यास मदत मिळू शकली नाही. काही वेळात कुटुंबीयांकडून शिवबाचा शोध सुरू झाला असता, तो स्वीमिंग टँकमध्ये आढळून आला. त्यास बाहेर काढून पोटातून पाणी काढण्याचा प्रयत्न केला.

परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने त्यास नजीकच्या रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी लोणावळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor: शिंदे गटातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार? मुंबईत काय चाललंय? महापौरपदासाठी गूढ वाढलं

BMC Election: मानखुर्दमध्ये ‘एमआयएम’ सरस; मुस्लिम मतदारांचा राजकीय कल बदलल्याचे चित्र, अपेक्षेहून अधिक यश!

RAC बंद, सेकंड क्लासला किमान ५० किमी तर स्लीपर क्लाससाठी २०० किमीचे भाडे द्यावंच लागेल; रेल्वेचे नवे नियम

Panchang 18 January 2026: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

HAL Recruitment 2026: HAL अप्रेंटिस भरती 2026 जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि वॉक-इन अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT