hoy mi vachit.jpg 
नाशिक

'आज होय मी वंचित'...शिक्षक कुटुंबियांचे अनोखे आंदोलन...वाचा सविस्तर

संजीव निकम : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्याच्या विविध जिल्ह्यांतील वर्षानुवर्षे आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांनी ‘आज होय मी वंचित’ असा हॅशटॅग वापरून अनोखे आंदोलन करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अनेकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या मोहिमेत या विभक्त शिक्षकांच्या कुटुंबातील चिमुरड्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. या हॅशटॅगला हजारो इम्प्रेशन्स मिळाली. 

अंतर दूर झाले पाहिजे

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण आपापल्या कुटुंबीयांची काळजी घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर बाराशेहून अधिक शिक्षक दांपत्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांत अडकून पडल्याच्या पार्श्वभूमीवर ट्विटरसह फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर हे आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून पती-पत्नीमधील अंतर दूर व्हावे, किमान एका जिल्ह्यापुरते का होईना हे अंतर दूर झाले पाहिजे, यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त मार्च महिन्यात सैल झाल्यात रेशीमगाठी अशी मोहीम राबविण्यात आली. त्यात पत्नी व पतीमधील अंतर एक हजार ते पंधराशे किलोमीटरचे असल्याने कुटुंबासोबत मुलांची होणारी फरफट याकडे तेव्हाही लक्ष वेधण्यात आले होते. 

आमदार रोहित पवार यांचा पुढाकार 

आमदार रोहित पवार यांनी आता याबाबतीत पुढाकार घेतला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे गाऱ्हाणे नेले. मात्र कोरोनाच्या आगमनामुळे प्रशासकीय कामकाज थांबले अन् या आंतरजिल्हा बदल्या रखडल्या. या सर्व प्रश्नांकडे आम्ही वंचित या हॅशटॅगखाली गेल्या दोन दिवसांपासून ट्विटवर मोहीम सुरू होती. त्याला प्राथमिक शिक्षक संघासह राज्यातील शिक्षक आमदार व विविध संघटनांनीही पाठिंबा दिला. आजच्या या अनोख्या आंदोलनात विभक्त कुटुंबातल्या मुलांनी आपले फोटो शेअर करून भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT