Artists perform various scenes and performances in processions on the occasion of child's marriage for the preservation and promotion of tribal culture.
Artists perform various scenes and performances in processions on the occasion of child's marriage for the preservation and promotion of tribal culture. esakal
नाशिक

Unique Wedding : विवाह सोहळ्यात घडवले आदिवासी संस्कृतीचे दर्शन! पारंपारिक पद्धतीला फाटा

विजय पगारे

Unique Wedding : लग्न समारंभात पारंपारिक लग्नपद्धतीला तसेच हुंडा, मानपान यांना फाटा देत इगतपुरी येथील आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवून एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम सुरु केला आहे.

यातून विविध देखावे, नृत्य सादरीकरण करण्यात आले. आदिवासी संस्कृती वर्धक उपक्रम सादर करत एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडल्याने या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे. (Unique Wedding vision of tribal culture created in wedding ceremony Break traditional way nashik news)

तळेगाव (ता. इगतपुरी ) येथील सुमन तळपाडे व इगतपुरी केंद्राचे केंद्रप्रमुख तसेच आदिवासी शिक्षक संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे यांचे पुत्र प्रा. नितीन यांचा विवाह शिवरे येथील अनिता व विष्णू फकीरा सताळे यांची कन्या एचडीएफसी बँकेतील अधिकारी सोनाली यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात झाला.

दोन्ही परिवारातील सदस्यांनी आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी विविध पथकांची उपस्थिती विवाह सोहळ्याप्रसंगी मिरवणुकीत सादरीकरण करण्याचा निर्णय झाला. विवाह सोहळ्यातील वरात मिरवणुकीत विविध पोशाख परिधान आदिवासी पथकांनी आदिवासी संस्कृतीवर प्रकाशझोत टाकत नृत्य व नाटक सादरीकरण केले.

आदिवासी समाजातील विविध सण, उत्सव याचे दर्शन घडवले. या प्रसंगी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश ढोन्नर, धनंजय दोबाडे, उपसरपंच ज्ञानेश्वर झोले, भाऊ भुरबुडे आदींसह राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मोतीराम पवार, महासंघटक हिरामण चव्हाण, उत्तम भवारी, चंद्रकांत लहांगे, स्वाभिमानी शिक्षक संघटना राज्य अध्यक्ष काशीनाथ भोईर, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे,

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष व एनडीपीटी अध्यक्ष आनंदा कांदळकर, संचालक उमेश बैरागी, जिजा खाडे, प्रभाकर चव्हाण, जिल्हा सरचिटणीस तुकाराम भोये, धनराज वाणी, रवींद्र लहारे, हरिश्चंद्र भोये, देवीदास देशमुख, कैलास भवारी, पांडुरंग पवार, भाऊराव बांगर आदी उपस्थित होते.

"आदिवासी संस्कृतीचे जतन संवर्धन व्हावे यासाठी शिक्षक संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असतो. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे उपक्रम दाखविल्यास संस्कृतीचे जतन व संवर्धन होईल हाच प्रयत्न मी माझ्या मुलाच्या विवाह सोहळ्यात केला."

- निवृत्ती तळपाडे, जिल्हाध्यक्ष, आदिवासी शिक्षक संघटना

"आदिवासी संस्कृतीचा एक आगळावेगळा ठेवा समाजात आहे. मात्र शहरीकरणाकडे वाटचाल झाल्याने आदिवासी संस्कृती कालबाह्य होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे यांनी राबविलेला उपक्रम समाजासाठी स्तुत्य आहे." - हिरामण खोसकर, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT