The Raja Mandal of Nashik stopped by stopping Vajantri as Azan started. esakal
नाशिक

Unity In Diversity: अजान सुरू होताच ढोल वादन थांबले! नाशिककरांकडून अनंत चतुर्थी, ईद मिलाद उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

Unity In Diversity : अनंत चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद दोन्ही पवित्र सण एकाच दिवशी गुरुवारी (ता. २८) साजरे करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, आका की आमद मरहबा सुरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात झाली.

नागरिक आणि पोलिस तसेच जिल्हा प्रशासनासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना दुपारची जोहरची नमाजासाठी अजान सुरू होताच नाशिकचा राजा गणेश मंडळासह अन्य मंडळांनी ढोलपथक तसेच डीजे दोन मिनिटांसाठी बंद केले.

अजान समताच त्यांनी पुन्हा वाजंत्री सुरू करत पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले. तर मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांना येण्या- जाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी दूध बाजार येथील हेलबावडी मशीदचे दर्शनी प्रवेशद्वार मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवले. (Unity In Diversity Azan begins drumming stops Anant Chaturthi Eid Milad in celebration from Nashikkars nashik)

मागील दार नमाजासाठी उघडे करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दूध बाजार येथे पोलिस प्रशासनाचे शांतता समिती स्वागत कक्षात अनेक मुस्लिम बांधवांनी सहभागी होत गणेश मंडळांचे स्वागत केले. मिरवणूक प्रारंभ करतानादेखील मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावत धार्मिक सलोख्याचा संदेश दिला.

मिरवणुकीत सहभागी बांधवांना कुठल्या समस्या आल्यास त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. इतकेच नाही तर हिंदू मुस्लिम तरुण मित्र एकमेकांना शुभेच्छा देताना आढळून आले. दुसरीकडे अनंत चतुर्थी मिरवणुकीनिमित्त गणपती बाप्पा मोरया तर ईद-ए-मिलादनिमित्त आका की आमद मरहबा सुरा, अल्लाहू अकबर सुरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी सलोख्याचे दिसून आलेले विविध दृश्यांनी धार्मिक सामाजिक आणि सलोख्यात दर्शन घडले. त्याचप्रमाणे बोहरी समाजाच्या सोफिया फाउंडेशननेही आपले वैद्यकीय सुरक्षा रक्षक तसेच वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले.

इतकेच नाही तर गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात येणारा जुलूस दोघांचे भव्य स्वरूप असल्याने चेंगराचेंगरी होऊ नये. जुलूस किंवा विसर्जन मिरवणुकीस त्रास होऊ नये.

यासाठी मुस्लिम बांधवांनी विसर्जनाच्या दिवशी केवळ धार्मिक कार्यक्रमांनी ईद-ए-मिलाद साध्या पद्धतीने साजरी केली. तर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवार (ता. २९) रोजी जुलूस काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय आदर्श ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT