nashik unlock esakal
नाशिक

Nashik : तिसऱ्या लाटेच्या तोंडावर अनलॉक लांबण्याची चिन्हे

विनोद बेदरकर

नाशिक : नागरिकांनी निर्बंध (nashik unlock) कडेकोट पाळण्याबाबत गंभीरपणा दाखविला, तरच संसर्ग दर कमी होऊन नाशिक अनलॉकच्या दिशेने वाटचाल करू शकणार आहे. निर्बंध शिथिलतेबाबत नाशिककरांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या उपस्थितीत दोन दिवसांत बैठक अपेक्षित आहे. (unlock-will-postponed-due-corona-third-wave-nashik-marathi-news)

अनलॉक लांबण्याची चिन्हे

अनलॉकनंतर बाजारपेठा व पर्यटनस्थळांवर गर्दी होत असून, त्यासोबत कोरोनाचा संसर्ग (coronavirus) दर पाच टक्क्यांच्या आत येत नसल्याने, आणखी आठवडाभर निर्बंध राहण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येऊ लागल्याने राज्यात पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार नाशिकमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शनिवार आणि रविवार दोन दिवस वीकेंड लॉकडाउनही केला जात आहे. दर आठवड्याला कोरोना रुग्णसंख्या विचारात घेऊन निर्बंधांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्यात येऊन निर्बंधातून काही प्रमाणात सूट देण्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता नाशिकमधील निर्बंध शिथिल होऊन दुकानांना वेळ वाढवून देणार का तसेच मॉल, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सोशल डिस्टिंन्सिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन

नाशिकमध्ये सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. पर्यटनस्थळांवरही बंदी असूनही गर्दी होत असून, सोशल डिस्टिंन्सिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने रुग्णसंख्या पाच टक्क्यांच्या आत येऊ शकलेली नाही. राज्याच्या टास्क फोर्सच्या बैठकीत अशाच पद्धतीने गर्दी राहिली, तर तिसरी लाट लवकर येईल, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये तरी अजून काही दिवस निर्बंध शिथिल करण्याबाबत प्रशासन राजी नसल्याचे सूत्रांकडून समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT