Tension
Tension esakal
नाशिक

Pharmacy Admission Delay : आता 2023 मध्येच विद्यार्थी ठेवतील महाविद्यालयात पाऊल!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठी बहुतांश व्‍यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्णत्‍वाकडे आलेली आहे. दुसरीकडे औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची गुंतागुंत कायम आहे. त्‍यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा उजाडू शकतो. अध्ययनासाठी विद्यार्थी आता २०२३ मध्येच महाविद्यालयात पाऊल ठेवतील, अशी परिस्‍थिती निर्माण झालेली आहे. (Unprecedented Confusion of Pharmacy Course Admissions Nashik News)

औषधनिर्माणशास्‍त्र विद्याशाखेतील पदविका, पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाचा अभूतपूर्व गोंधळ झालेला आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झालेली आहे. फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडियाने यासंदर्भात सर्वोच्च न्‍यायालयात मांडलेल्‍या भूमिकेमुळे संपूर्ण गोंधळ निर्माण झाल्‍याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

पीसीआयने देशभरातील औषधनिर्माणशास्‍त्र महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी केल्‍यानंतर, यासंदर्भातील अंतिम निश्‍चितीसाठी न्‍यायालयाकडे ३० नोव्‍हेंबरपर्यंत मुदत मागितली होती. प्रवेश प्रक्रिया रेंगाळल्‍याने विद्यार्थी, पालकांचा दबाव वाढू लागला आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ प्रमाणेच प्रवेश क्षमता कायम ठेवण्याची भूमिका पीसीआयने घेतली होती. सर्व अटी-शर्तींच्‍या अधीन राहून ही मान्‍यता दिलेली असल्‍याने तसे प्रतिज्ञापत्र महाविद्यालयांकडून मागविले होते. त्‍यासाठी २२ नोव्‍हेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे.

या प्रतिज्ञापत्रांची छाननी व अन्‍य संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करताना न्‍यायालयाकडे मागितलेली वेळदेखील ३० नोव्‍हेंबरला पूर्ण होईल. त्‍यानंतरच पुढील प्रवेश प्रक्रिया राबविली जाण्याची शक्‍यता आहे. आता तर थेट ३० नोव्‍हेंबरपर्यंत मुदतवाढ करताना, वेळ मारुन नेण्याचा प्रयत्‍न केलेला आहे. डिसेंबरमध्ये प्रक्रियेला सुरवात झाल्‍यानंतर तीन फेऱ्या पूर्ण करताना किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागणार आहे.

गुणवत्ता ढासळण्याची भीती

औषधनिर्माणशास्‍त्र शाखेत प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्‍या अनेक विद्यार्थ्यांकडून अन्‍य पर्यायांची चाचपणी केली जात आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी अन्‍य विविध अभ्यासक्रमांना प्रवेशदेखील घेतलेले आहेत. अशात उशिराने होत असलेल्‍या औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमाला सुमार दर्जाचे विद्यार्थी प्रवेश घेण्याची दाट शक्‍यता आहे. संशोधन, कल्‍पकतेवर आधारित या क्षेत्रातील गुणवत्ता यामुळे ढासळू शकते, अशी भीती आता व्‍यक्‍त होत आहे.

अभ्यासक्रमनिहाय मुदतीबाबतचा तपशील असा-

अभ्यासक्रम नोंदणीला सुरवात.. सध्याची वाढीव मुदत

डी. फार्मसी ९ जून १५ नोव्‍हेंबर

बी. फार्मसी २८ सप्‍टेंबर ३० नोव्‍हेंबर

एम. फार्मसी १३ ऑक्‍टोबर ३० नोव्‍हेंबर

"फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडियाला महाविद्यालयांकडून प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहेत. पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम नोंदणीला यामुळे मुदतवाढ दिलेली असून, आता डिसेंबरमध्येच प्रवेशाची प्रत्‍यक्ष प्रक्रिया पार पडेल. ही प्रक्रिया जलदगतीने राबविताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे."

-प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, एमजीव्‍ही संस्‍थेचे फार्मसी महाविद्यालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT