Damage to Balu Sable's house, Sludge in the brick kiln in the area
Damage to Balu Sable's house, Sludge in the brick kiln in the area esakal
नाशिक

Unseasonal Rain Damage : इगतपुरीच्या पूर्व भागात गारपिटीने शेतीचे नुकसान; घरांची मोठी पडझड

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain Damage : काही दिवसांपूर्वीच झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते, यातून शेतकरी सावरत असताना रविवारी पुन्हा गारपीट आणि वादळी पावसाचे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर चालून आले.

यामुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे. या पावसाने शेतीबरोबरच घरांची पडझड झाली असून विटभट्ट्यांचेही नुकसान झाले आहे. (Unseasonal Rain Damage to agriculture due to hailstorm in eastern part of Igatpuri nashik news)

सध्या कांद्याला भाव नाही, कोणत्याही शेतमालाला योग्य भाव नाही असे असताना अस्मानी संकट चालून येत आहे ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी (ता.९) सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे.

मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला बागायती पिके,काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, टोमॅटो यांसह चाऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. विटभट्ट्या भिजल्यामुळे मालकांसह कामगारांचेही मोठे हाल झाले आहेत.

सायंकाळच्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागातील साकूर फाटा, शेणित, धामणगाव, भरविर खुर्द, अडसरे खुर्द, बेलगाव, धामणी, तातळेवाडी, पिंपळगाव मोर, टाकेद परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. या नुकसानकारक पावसाबरोबर काही काळ या भागात वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.

या जोरदार पावसामुळे अडसरे खुर्द येथील शेतकरी बाळू लक्ष्मण साबळे यांच्या घराचे छत पूर्णपणे उडून गेले. लोखंडी च्यानल वाकून, घराची पूर्ण पत्रे फुटली व गुरेवासरांची पडवी देखील उघडी पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी साबळे कुटुंबाने एक रात्र पावसात कशीबशी काढली.

पावसाने घरातील धान्यासह मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची स्थानिक सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेविका उषा राठोड यांनी पाहणी केली. भंडारदरावाडी येथील शेतकरी दगडू सखाराम साबळे यांच्या घराचे पूर्ण छत उडून गेले.

यात त्यांचे पूर्णतः नुकसान झाले. या नुकसानीची त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी सर्वत्र परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

"इगतपुरीच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसामुळे गारपिटीने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक तलाठी, ग्रामसेवक यांना देण्यात आले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई साठी अहवाल पाठविला जाणार आहे."

- परमेश्वर कासुळे, तहसीलदार, इगतपुरी.

"रविवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीने अचानक एकाकी घराचे पत्रे छत पूर्णपणे उडून गेले. यात सर्व कुटुंब उघड्यावर पडले. घर सावरण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करीत त्वरित नुकसानभरपाई द्यावी." - सुनीता बाळू साबळे

"रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे घराचे पूर्णपणे लोखंडी पत्र्याचे छत उडून गेले. जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे.'

- दगडू साबळे, नुकसानग्रस्त शेतकरी, भंडारदरावाडी.

"मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे वीटभट्टीच्या कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले होते, यातून कसाबसा सावरतोय तोच अचानक काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टीचे पूर्णतः नुकसान झाले असून सर्व मेहनतीवर पाणी फिरले आहे."

- रामनाथ जाधव, वीटभट्टी व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...तर खत-बियाणे दुकानांचे परवाने रद्द! शेतकऱ्यांना लिंकिंगचा आग्रह, ज्यादा दराने व मुदतबाह्य खतविक्री नकोच; शेतकऱ्यांनी ‘हा’ क्रमांक जपून ठेवावा

NCERT Syllabus : सकारात्मक विचारांची पिढी घडवायची आहे;गुजरात दंगल, बाबरी मशिदीचा उल्लेख वगळल्याबाबत सकलानींचे प्रतिपादन

Sakal Podcast : EVM वरून मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली ते राज्यात सध्या मॉन्सूची स्थिती काय?

Monsoon Update : मॉन्सूनची वाटचाल अडखळली;राज्यात सहा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला

Eid Ul Adha 2024 : बकरी ईद बनवा अधिक स्पेशल, घरच्या घरी करा ‘या’ पदार्थांचा बेत

SCROLL FOR NEXT