Unseasonal Rain Crop Damage esakal
नाशिक

Unseasonal Rain Nashik : पावसामुळे नाशिक तालुक्यात दाणादाण; द्राक्ष, गहू पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain Nashik : जोरदार वारे, गारपीटीसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.

नाशिक रोड, जेलरोड, उपनगर परिसरात डॉ. आंबेडकर जयंती फलकांचे मोठे नुकसान झाले. (Unseasonal rain Damage to grain grape wheat crop nashik news)

नारायणबापू चौकातील नवीन पोलिस चौकीचे छप्पर तुटून बाजूला पडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सात ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी आल्या.

जयभवानी रोडवरील अश्विनी नगरमध्ये बंगल्याच्या गेटवर तर बिटको चौकात दुचाकीवर झाड पडले. जेल रोडच्या मोगल रुग्णालयाजवळ, शिखरेवाडीतील बालाजी मंदिर रस्ता, बिटको महाविद्यालय शेजारी, तसेच टाकळी रोडवर तीन ठिकाणी झाडे पडली. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह आवारातही झाड कोसळले.

नाशिक तालुक्यात द्राक्ष बागा, गहू व कांदा पिकांचे नुकसान झाले. पळसेत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शेत पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून दोन दिवसात पंचक्रोशीतील नुकसानीचे पंचनामे न झाल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

महसूल विभागाने पंचनामे करताना पीक लागवड शेतीला लागणाऱ्या साहित्यासह शेतीला लागणारी मजुरी, शेतीचे झालेले नुकसान या सर्वाचे स्वतंत्र पंचनामे करावे,तर शिंदे गावातील काही घराचे पत्रे उडवून गेले तर पळसे गावातील दारणा संकुल या वसाहतीतील नागरिकांच्या घरात बेमोसमी पावसाचे पाणी गेल्याने अनेक नागरिकांना रात्र जागूनच काढावी लागली या ठिकाणचेदेखील पंचनामे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावे.

तसेच काही घरे बाधित झाले असतील तर त्याची वेगळी नोंद करावी अशी मागणी करण्यात आली. बाजीराव गायधनी, राजाराम गायधनी, संपत गायधनी, तुकाराम गायधनी, विलास गायधनी, नामदेव गायधनी, रामदास गायधनी आदी शेतकऱ्याच्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. कांद्याचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशी मागणी पोलिसपाटील सुनील गायधनी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, माजी सरपंच दीपक गायधनी, सोसायटी संचालक संजय गायधनी, दिलीप गायधनी, तलाठी खोब्रागडे, विलास चौधरी, संतोष गायधनी, विलास गायधनी यांनी केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात...भ्रष्टाचाराचं कोणतं प्रकरण कानावर आलं नाही...अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक!

Monsoon Beach Travel: पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जातंय? या गोष्टी लक्षात ठेवा

मोठा निर्णय : नीता अंबानीची टीम पुढील हंगामात नव्या नावासह मैदानात उतरणार, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी...

Maharashtra Latest News Live Update : नागपुरात उद्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार..

Daulat Sugar Factory Auction : दौलत साखर कारखान्याची होणार विक्री, ‘एनसीडीसी’कडून लिलावाची नोटीस; ९ ऑक्टोबरला ई-लिलाव

SCROLL FOR NEXT