Damage crop due to unseasonal rains  esakal
नाशिक

Unseasonal Rain : गारपिटीने 658 कोटींच्या पिकांची धूळधाण! बागलाणचे ५३ टक्के नुकसान

महेंद्र महाजन

Unseasonal Rain Crop Damage : अवकाळी पाऊस, वेगवान वारे आणि गारपिटीमुळे ७ ते १२ एप्रिलला जिल्ह्यातील २३ हजार ६९८ हेक्टर ६४ आर. क्षेत्राला दणका बसला आहे. आपत्तीग्रस्त क्षेत्र, त्यातील अपेक्षित उत्पादन आणि बाजारभावाच्या आधारे ६५८ कोटींच्या पिकांची धूळधाण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक ५३ टक्के म्हणजे, १२ हजार ६०४ हेक्टर ३० आर.ची दाणादाण बागलाण तालुक्यात उडाली आहे. जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त एकूण क्षेत्रात ९० टक्के क्षेत्र बागायती असून, त्यातील ७७ टक्के म्हणजेच, १८ हजार ३४६ हेक्टर ४७ आर. इतके कांद्याचे क्षेत्र भरडले आहे. (Unseasonal rain dusted crops worth 658 crores 53 percent loss of horticulture nashik news)

त्र्यंबकेश्‍वर तालुक्याचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वदूर सहा दिवसांमध्ये अवकाळी पाऊस, वेगवान वारे आणि गारपिटीने थैमान घातले. जिल्ह्यातील ४६७ गावांमधील ३८ हजार ४४२ शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीला सामोरे जावे लागले.

बागलाण तालुक्यात ४० गावांतील दहा हजार ४१८ शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. बागलाण तालुक्यातील नुकसान झालेले क्षेत्र पीकनिहाय हेक्टरमध्ये असे : कांदा- दहा हजार ४२०, गहू- ६४.८०, बाजरी- ७.८८, भाजीपाला- ८६४.४०, द्राक्षे- ५१४, आंबा- १, डाळिंब- ७२७.५०.

इतर तालुक्यातील एकूण आपत्तीग्रस्त क्षेत्र हेक्टरमध्ये याप्रमाणे : मालेगाव- ६६६, नांदगाव- ५३०४.८०, कळवण- ५१८.५०, देवळा- ३५४.४०, दिंडोरी- १३०.६०, सुरगाणा- ५६८.४५, नाशिक- ५९७.३०, पेठ-११८.२०, इगतपुरी- ५४४, निफाड- एक हजार ७४, सिन्नर- ३७७.३०, चांदवड- ८३९.४०, येवला- १.२०.

द्राक्षांचे क्षेत्र हजारावर हेक्टर

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने या महिन्यातील सहा दिवसांमधील शेतीच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सरकारला पाठवला आहे. त्यानुसार द्राक्षांचे एक हजार ६९ हेक्टरवरील द्राक्षांचे, तर ८७२ हेक्टर डाळिंबाचे नुकसान झाले आहे.

द्राक्षांचे नुकसान झालेले क्षेत्र तालुकानिहाय हेक्टरमध्ये असे : नांदगाव- ४.६०, कळवण- ८, दिंडोरी- ३०, नाशिक- ७०, निफाड- ३३२.६९, चांदवड- ५६, येवला- १. डाळिंबाचे आपत्तीग्रस्त क्षेत्र तालुकानिहाय हेक्टरमध्ये असे : मालेगाव- ११०, नांदगाव- २३, देवळा- ११.५०.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

जिल्ह्यातील नुकसान हेक्टर

कांदा- १८,३४६.४७, गहू- ५३६.७०, हरभरा- १२, मका- ३६७.७०, टोमॅटो- २५५.२०, बाजरी- २२१.८८, भाजीपाला व इतर-१४५३.८०, ऊस- ७, चारा पिके- ३३, इतर फळपिके- ११, वेलवर्गीय फळे- ३५, मोसंबी- ८.२०, चिकू- ८.२०, पेरू- ३.२०, द्राक्षे- १०१६.६९, आंबा- ४६४, लिंबू- १३.६०, डाळिंब- ८७२.

पीकनिहाय आर्थिक नुकसानीचा प्राथमिक अंदाज

(क्षेत्रनिहाय अपेक्षित उत्पादन आणि बाजारभावाच्या आधारे आकडे रुपयांमध्ये)

० कांदा- ३९० कोटी ० आंबा- चार कोटी ६४ लाख

० द्राक्षे- १०२ कोटी ० ऊस- २१ लाख

० डाळिंब- १०५ कोटी ० चारा पिके- १९ लाख ८० हजार

० गहू- पाच कोटी ३६ लाख ० कांदा रोपे- ६९ लाख ३० हजार

० हरभरा- दहा लाख ८० हजार ० इतर फळपिके- ४९ लाख ५० हजार

० मका- तीन कोटी ६७ लाख ० लिंबू- ८१ लाख ६० हजार

० टोमटो- सहा कोटी ३८ लाख ० वेलवर्गीय फळे- १३ लाख १२ हजार

० बाजरी- एक कोटी ३३ लाख ० मोसंबी- ४९ लाख २० हजार

० भाजीपाला- ३६ कोटी ३२ लाख ० चिकू- ९० हजार आणि ० पेरू- तीन लाख ८४ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT