Unseasonal Rain Crop Damage esakal
नाशिक

Unseasonal Rain : अवकाळीने चुकविले बळीराजाचे गणित; रब्बी हंगामातील पिकावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain Nashik : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संकटांची मालिका अद्यापही सुरूच आहे. खरीप आणि रब्बी हंगामातही अस्मानी संकट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. भात पिकाचे दुःख विसरत नाही, तोच आता रब्बी हंगामातील विविध पिकांच्या लागवडीपासून शेतकऱ्यांवर आपत्ती सुरु आहे. (Unseasonal Rain Effect on rabi season crop nashik news)

संकटांतूनही कसेबसे सावरत आलेल्या पिकांवर आता वारंवार अवकाळी पावसाचा मारा अनेक पिकांना मारक ठरत असुन, उत्पादनात घट होणार असल्याने बळीराजाचे आर्थिक गणित चुकले आहे. मागील पंधरवाड्यात व महीन्यापूर्वीही अवकाळी पावसाने तालुक्याच्या विविध भागात मारा केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासुन पश्‍चिम भागात होत असलेला शिडकावा अन्‌ ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळीमुळे हंगामातील काकडी, मिरची, टोमॅटो, वांगी, गहु, मसुर आदी पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता असुन, शेतकऱ्यांची संपूर्ण मेहनत वाया गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

"कष्टाने पिकविलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान होत आहे. शेतकरी बांधवांना अगोदरच मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बांधवांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा आहे." -संतोष कोकणे, शेतकरी, त्रिंगलवाडी

"गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण व आजच्या शिडकाव्यामुळे नुकसान झाले. यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या व शेतात उभ्या असलेल्या पिकांना याचा फटका बसणार आहे." -पांडुरंग धांडे, शेतकरी, पाडळी देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

West Bengal Politics: ‘तृणमूल’कडून झालेला छळ विसरलो नाही; सुवेंदू अधिकारी यांचा इशारा, राजकीय गुन्ह्यांची चौकशी होणार!

'मुलांना जन्माला घालण्यापेक्षा कुत्रा पाळा' शेफाली शाहचा सल्ला, तरुण पिढीला दिला 'हा' सल्ला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

SCROLL FOR NEXT