Due to the rain, it seems that water has accumulated on the main roads.
Due to the rain, it seems that water has accumulated on the main roads. esakal
नाशिक

Unseasonal Rain : घोटीत पावसाची जोरदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain : घोटीसह परिसरात गुरुवार ( ता. ४ ) रोजी दुपारी दोन वाजेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावत बाजारातील व्यवसाहिकांसह नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचे पाहायला मिळाली. (Unseasonal Rain Heavy presence of rain in Ghoti nashik news)

प्रचंड उकाडा व नंतर काळे ढग भरून आल्याने दुपार नंतर पावसाने सुमारे एक तास हजेरी लावल्याने गटारी तुडुंब भरून मुख्य मार्गांवर पाणी साठल्याचे जागोजागी दिसून आले. अचानकपणे पावसाने लावलेली हजेरीमुळे बाजारात दाखल शेतकरी बांधवांची देखील हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान महामार्गांवर छोटे-मोठे व्यवसाहिक यांची देखील तारांबळ उडाली तर नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी पावसापासून बचाव व्हावा म्हणून दुकानाचा असारा घेतांनाचे चित्र पाहायला मिळत होते.

तालुक्याच्या पूर्व पट्ट्याला झोडपत पाऊस अखेर घोटीत दाखल होऊन इगतपुरीकडे रवाना झाला. पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विशेष म्हणजे गटारी तुडुंब भरल्याने गटाराचे पाणी थेट मुख्य मार्गांवर आल्याने त्यातून मार्ग काढतांना वाहनांचे पाणी चौफेर पसरत होते. एक तासात शहरात पाणीच पाणी झाल्याने पावसाळ्यातील पाण्याची आठवणी ताज्या झाल्या.

याच दरम्यान घोटी पोलीस ठाण्यालगत असलेल्या विजेच्या ट्रान्सफॉरमरचा जाळ होऊन शहरातील विज पुरवठा काही काळ खंडित झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालय, पिठाच्या गिरण्या काही काळ बंद स्थितीत होत्या. पावसाने उघडीप देताच पुन्हा शहरात वर्दळ पाहायला मिळाली. परिसरातील शेतीला देखील यामुळे फटका बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT