unseasonal rain damaged crops esakal
नाशिक

Unseasonal Rain Damage : तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने बळीराजावर संकट

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते

Unseasonal Rain Crop Damage : सिन्नर तालुक्यातील अनेक भागात सुमारे अर्धा ते एक तास विजेच्या कडकडासह वादळी वारा व पावसाचा हाहाकार, तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने विजांसह पावसाने धुडगूस घातल्याने.

सिन्नर तालुक्यात विशेष करून पूर्व व पश्चिम भागातील अनेक परिसरात शुक्रवारी साडेतीन वाजता दुपारी अनेक ठिकाणी पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

रविवार व सोमवारी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने शेती पिकांवर मोठे संकट निर्माण झाले होते त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी बैठक बोलून नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

अनेक गावात पंचनामे होत असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. काढणीस आलेला गहू, हरभरा ,कांदा पिकांचे रविवारी व मंगळवारी झालेल्या पावसात मोठे नुकसान झाले असून, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान विजांसह पाऊस त्यात पहाटे ढगाळ वातावरण यामुळे अनेक नागरिकांनी या वातावरणाची धास्ती घेतली आहे.

जिल्ह्यात अनेक भागात गहू सोंगणीला आलेला असताना हाती तोंडी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. तर उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली .असून या पावसाचा या कांद्यालाही मोठा फटका बसलेला आहे.

गहू, हरभरा, मका, हे सोगणीला आलेले पीक पावसात भिजल्याने खूप मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकड्यांचा वादळ तसेच काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी राजा शेत जमिनीमध्ये असलेल्या पिकाकडे धाव घेऊन कांदा, गहू हे पीक झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे.

त्यातच द्राक्ष उत्पादकांमध्ये या पावसाने मोठी चिंता वाढवली असून हाती तोंडाशी आलेला घास या गाराच्या व अवकाळी पावसामुळे गेलेला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

रविवार व सोमवारी झालेल्या पावसाने वडझिरे येथे वीज पडून राजाराम नागरे यांची ठार झाली तालुक्यात वेगवेगळ्या गावात पाच ते सहा ठिकाणी घरांची पडझड झाल्याची घटना घडल्या आहेत. माळेगाव येथील पांडुरंग सांगळे ,विश्वनाथ सांगळे यांचे तीन एकर कांदा, दोन एकर वालवड ,पाच एकर काकडीचे नुकसान झाले आहे.

तर या अवकाळी पावसामुळे नुकसानीचे प्रमाण अधिक असून कांद्याला अक्षरशः पात शिल्लक राहिलेली नसून तर टोमॅटो ,काकडी तर पूर्ण उध्वस्त झाली आहे. गहू, वालवड, कोबी, कांदा, मका आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेचे दिसून येते.

त्यातच ग्रामीण भागात व शहरी भागात वीजपुरवठा काही काळ खंडित झालेला होता. अनेक ठिकाणी शहरी भागात तसेच ग्रामीण भागात पाणी साचलेले होते शहरी भागात नागरिकांची रस्त्यावर एकच धावपळ उडाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT