State Board of Secondary and Higher Secondary Education esakal
नाशिक

Nashik News : अतिरिक्‍त गुणांसाठी प्रस्‍तावाची 23 पर्यंत संधी; मुदतवाढीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीच्‍या परीक्षांना प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्‍त गुण दिले जात असतात. हे गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे प्रस्‍ताव सादर करण्यासाठी मुदत वाढविली आहे.

त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना २३ जानेवारीपर्यंत प्रस्‍ताव सादर करता येतील. (Up to 23 opportunities to offer for extra marks Decision on extension of time Nashik News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

शास्‍त्रीय कला, चित्रकला व लोककला याबाबत प्रस्‍ताव सादर करण्यास मुदतवाढ दिलेला असल्‍याचे मंडळाने कळविले आहे. यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी प्रस्‍ताव सादर करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत होती.

तर, शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्‍ताव सादर करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत दिलेली होती. कला संचालनालयातील कला संचालक यांनी दिलेल्‍या माहितीनुसार एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला स्‍पर्धेचा २०२२ चा निकाल १६ जानेवारीला जाहीर केला जाणार आहे.

यामुळे शास्‍त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्‍ताव स्वीकारण्याच्या मुदतीत वाढ करण्याबाबत विनंती केलेली होती. त्‍याआधारे मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आता २३ जानेवारीपर्यंत प्रस्‍ताव सादर करता येणार आहे. तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्‍ताव सादर करण्याची वाढीव मुदत ३१ जानेवारीपर्यंत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT