Potholes on Roads latest marathi news esakal
नाशिक

Nashik : तातडीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षणाच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या पंधरा दिवसापासून शहर व परिसरात पावसाची संततधार (Constant rain) कायम असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे (Potholes) झाले आहे. खड्ड्यांवरून शहरात राजकारण सुरू झाल्याने महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC commissioner ramesh pawar) यांनी तातडीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या.

त्यातून २६७० खड्डे येत्या चार दिवसात पेव्हर ब्लॉकने तातडीने भरण्याच्या निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी अंदाजपत्रकातील ३० कोटी रुपयांची तरतूद खर्ची घातली जाणार आहे. (Urgent notice of survey of potholes on roads by nmc commissioner nashik Latest marathi news)

एकेकाळी गुळगुळीत रस्त्यांची ख्याती असलेल्या नाशिक शहरात सध्या रस्त्यांची चाळण झाली आहे. पाच वर्षात रस्त्यांवर जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनदेखील ही रस्ते सुस्थितीत नसल्याने गुणवत्तेचे पितळ उघडे पडले.

एकीकडे वाहनधारकांना कसरत करून रस्त्यावरून जावे लागते. त्यातून शारीरिक व्याधीदेखील जडत आहे. तर, दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरून राजकारणदेखील सुरू झाले आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांवरून नागरिकांकडून ओरड सुरू झाल्यानंतर बांधकाम विभागाला तातडीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आयुक्त पवार यांनी दिल्या. काही ठिकाणी त्यांनी स्वतः पाहणी केली.

एकदा रस्ता तयार झाल्यानंतर तीन वर्षांसाठी संबंधित ठेकेदाराला देखभाल दुरुस्ती बंधनकारक आहे. त्यानुसार नव्याने तयार करण्यात आलेल्या २०० किलोमीटर अंतरातील ३४ रस्त्यांची पाहणी आयुक्तांनी केली.

अपवाद वगळता रस्ते सुस्थितीत दिसून आले. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावरचा लेअर संबंधित ठेकेदारांकडून तातडीने त्या दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील २२०० किलोमीटर रस्त्यांवर एकूण ६२७० खड्डे असल्याचे सर्वेक्षण अंतिम निश्चित करण्यात आले.

त्यातील ३६०० खड्डे तातडीने भरण्यात आले, तर २६७० खड्डे येत्या चार दिवसात बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तंत्रज्ञानाच्या आधारे खड्डे बुजवावेत, ढोबळमानाने खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक किंवा मुरूम टाकू नये अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक टाकताना चौकोनी खड्डा करावा, अन्यथा पेव्हर ब्लॉक बाहेर पडल्यास त्याची जबाबदारीदेखील ठेकेदारांवर निश्चित केली जाणार आहे.

शहरातील खड्ड्यांची स्थिती

- २२०० किलोमीटरचे रस्ते.

- २०० किलोमीटरच्या ३४ रस्त्यांची पाहणी.

- सर्वेक्षणात ६२७० खड्डे.

- ३६०० खड्डे बुजविले.

- २६७० खड्डे शिल्लक.

"बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ३६०० खड्डे तातडीने भरण्यात आले आहे. तर, उर्वरित खड्डे येत्या चार दिवसात भरले जातील." - रमेश पवार, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Rate Prakash Awade : प्रकाश आवाडेंच्या जवाहर कारखान्याचा दर जाहीर, व्हिडिओद्वारे ३५१८ रुपयांची घोषणा; शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश

संजू सॅमसन CSK मध्ये येणार, पण चेन्नई लाडक्या 'थलापती'ची किंमत मोजणार? IPL 2026 लिलावापूर्वी चर्चेला उधाण

Konkan Railway Ro-Ro Service: कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ ची नवी झेप! वॅगनच्या वहनक्षमतेत मोठी वाढ; अवजड वाहतूकदारांना फायदा होणार

Latest Marathi Breaking News Live: करमाळ्यात उसाचा ट्रॅक्टर उलटला, चालकाचा मृत्यू

Video : ईश्वरीचा अर्णवला सरप्राईज द्यायचा प्लॅन फसला ! प्रोमो पाहून प्रेक्षकांना हसू अनावर; म्हणाले..

SCROLL FOR NEXT