urus crowd esakal
नाशिक

नाशिक : रविवारच्या सुटीने उरुस गजबजला

- युनूस शेख

जुने नाशिक : रविवारच्या सुटीने उरुस (urus) गजबजलेला. बडी दर्गा येथे बाबांचे दर्शन घेतल्यानंतर सर्वधर्मीय भाविकांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. त्यानंतर उरुसामध्ये फेरफटका मारत खरेदीचा आनंद लुटला. (Urus housefull on Sunday Nashik News)

हजरत पीर सय्यद सादिक शहा हुसेनी बाबा (बडी दर्गा) च्या ३९४ व्या उरुस शरीफला १८ मेपासून सुरवात झाली. गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा उरुसाचे आयोजन करण्यात आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी बाबांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. रविवारी (ता. २२) सुटीचा दिवस असल्याने गर्दीमध्ये अधिक भर पडली. शहर जिल्ह्याच्या विविध भागातून सर्वधर्मीय भाविक दर्शनासाठी आले होते. त्यांनी दर्शनाचा लाभ घेत आनंद लुटला. उरुस आणि फालुदा जणू एक समीकरण झाले आहे. जोपर्यंत फालुद्याचा आस्वाद घेतला जात नाही, तोपर्यंत उरूसचा आनंद घेतला नाही. असे समजले जाते.

फालुदा लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरत असतो. त्यानिमित्ताने आलेल्या सर्व भाविकांनी बाबांचे दर्शन होताच फालुद्याच्या दुकाने गाठली. त्यानंतर उरुसमध्ये फेरफटका मारत खरेदीचा आनंद घेतला. विविध प्रकारच्या खेळणी, कपडे, खाद्यपदार्थ, सौंदर्य आभूषणे, पादत्राणे अशी अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी केली. जत्रा (Yatra) म्हटली म्हणजे चिमुकल्यांना खेळांचे आकर्षण असते. त्यानिमित्ताने चिमुकल्यांसह ज्येष्ठांनी रहाट पाळणा, झोके, चक्री खेळाचा आनंद घेतला. उरुसामध्ये झालेली गर्दी बघता जनसागर उसळल्याचे भासत होते. दोन वर्षानंतर उरुसाचा आनंद घेता आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. समाधानकारक गर्दी झाल्याने उरुसमध्ये व्यवसाय थाटलेल्या व्यावसायिकांमध्येदेखील आनंदाचे वातावरण होते. विशेषतः महिलांची गर्दी अधिक बघावयास मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT