Crowd gathered to enjoy Ursa
Crowd gathered to enjoy Ursa esakal
नाशिक

Nashik News : सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा उरूस; बडी दर्गा येथे जिल्ह्यासह देश- विदेशातील भाविक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बडी दर्गा उरसाला बुधवारी (ता. ३) सुरवात झाली. उरुस केवळ एक यात्रा नव्हे तर सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडवणारा उत्सव आहे. दर्शनाचा लाभ घेण्यासह उरसाचा आनंद घेण्यासाठी सर्वधर्मीय बांधवांची होणारी गर्दी जणू त्याची साक्ष देत आहे.

बडी दर्गा येथे शहर जिल्ह्यासह देश- विदेशातील भाविक दर्शनास येतात, विशेष करून मे महिन्यात. (Urus show of social unity Devotees from home and abroad along with district at Badi Dargah Nashik News)

पुरातन काळापासून मे महिन्याच्या पहिल्या बुधवारी बडी दर्गा उरसाला प्रारंभ होत असतो. सुमारे १२ दिवस उरुस सुरू असतो. या बारा दिवसात दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. दर्शन झाल्यानंतर उरसाची मुख्य आकर्षण फालुदा सेवन करतात.

त्यासह अन्य विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. फिरण्याचा आनंद घेत असतात. तर, चिमुकले खेळणी खरेदीसह झोके, रहाड पाळणा तसेच अन्य खेळणी प्रत्यक्ष खेळण्याचा आनंद घेण्यासाठी पालकांकडे हट्ट करताना दिसून येतात.

यंदाही बुधवारपासून उरुस सुरवात झाली आहे. पहिले दोन ते तीन दिवस हवी तशी गर्दी झाली नाही. रविवार (ता. ७) पासून मात्र गर्दी होताना दिसून येत आहे. सर्वधर्मीय बांधव सर्वप्रथम बडी दर्गा येथे दर्शनाचा लाभ घेत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानंतर आपल्या चिमुकल्यांसह आनंद घेत आहे. महिला वर्गदेखील विविध प्रकारच्या खरेदीमध्ये व्यस्त झाल्याचे बघावयास मिळत आहे. कुठल्याही जातीपातीचा भेदभाव मनात न बाळगता सर्वजण दिलखुलासपणे उरसाचा आनंद घेत आहे.

त्यातून सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडत आहे. मुस्लिम बांधवांची संख्या जरी अधिक असली तरीदेखील उरसाचा आनंद घेताना कुठल्याही संकोच मनात वाटत नाही. सर्वांबरोबर एकत्र येत आनंद घेता येतो, ही अतिशय जोमाची बाजू आहे. दरवर्षी मोठ्या आतुरतेने उरसाची वाट पाहत असल्याच्या प्रतिक्रिया अन्य समाज बांधवांकडून देण्यात आल्या.

दर्ग्याची विशेषतः

दर्ग्यामध्ये दर्शनासाठी येणारे सर्वधर्मीय बांधव असतात. त्यामुळे बाबांच्या दर्ग्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मांसाहार आहार वर्ज्य आहे. फातेहा पठणासाठी सर्वधर्मीय भाविकांकडून मेथीची भाजी, भाकरी आणि तांदळाची खिचडी असे प्रसादाचे स्वरूप आहे. चौकीमध्येदेखील हेच पदार्थ तयार केले जात असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT