Nashik Latest marathi News esakal
नाशिक

Nashik : वडनेरभैरव ग्रामपालिकेतर्फे मुलींना अनोखी भेट

सकाळ वृत्तसेवा

वडनेरभैरव (जि. नाशिक) : येथील ग्रामपालिका ही चांदवड तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपालिका म्हणून ओळखली जाते. ग्रामपालिका ही नेहमीच समाजोपयोगी उपक्रम हाती घेत असते. त्यातच या ग्रामपालिकेने सध्या एक सुंदर काम केले आहे, ज्याची सर्वदूर चर्चा होत आहे.

ग्रामपालिकेने आपल्या स्वतःच्या निधीतून गावातील मुलींच्या शिक्षणासाठीचा प्रवासाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी संबंधित योजनेची अंमलबजावणी करून गावातील सर्व मुलींना रक्षाबंधनाची एक अनोखी भेट दिली आहे. (Vadnerbhairav ​​Grampalika gives unique gift to girls rakshabandhan 2022 Nashik Latest Marathi News)

वडनेरभैरव गावातील बऱ्याच मुली या गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवाडे फाट्यानजीक मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांत शिक्षण घेत असतात.

त्यासाठी मुलींना जाण्या-येण्यासाठी महाविद्यालयाची स्वतःची बसव्यवस्था आहे; पण त्यासाठी पैसे देऊन बस वापर करणे बऱ्याच मुलींना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून बऱ्याच वेळी मुली पायी जाणे किंवा महाविद्यालयात नियमित हजर न राहणे किंवा जाण्याची सोय नसल्याने पुढील शिक्षण थांबविणे, असा पर्याय निवडतात.

ही बाब विद्यमान सरपंच सुनील पाचोरकर, उपसरपंच योगेश साळुंके, ग्रामपालिकेच्या सर्व सदस्यांच्या लक्षात आली आणि म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एल. भगत त्यांची भेट घेतली. साधारण किती मुली या गावातून येतात त्यासाठी किती खर्च लागेल, याचा आढावा घेतला व त्यांनी यासाठी लागणारा निधी ग्रामपालिका स्वतःच्या निधीतून देईल;

पण एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, असे प्राचार्य भगत यांना सांगितले. रक्षाबंधनाच्या दिवशी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी महाविद्यालयात एका कार्यक्रमात संस्थेचे संचालक उत्तमबाबा भालेराव, विद्यालय विकास समितीचे अध्यक्ष दिलीपराव धारराव, प्राचार्य, शिक्षक व सर्व लाभार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत ३१ हजार ५०० रुपयांचा धनादेश महाविद्यालयास दिला.

त्यामुळे १२६ मुलींना महाविद्यालयाचा बसचा प्रवास फ्री झाला. ग्रामपालिकेचे हे पाऊल म्हणजे खऱ्या अर्थाने विकसित भारताचे एक उदाहरण आहे, असे मत उत्तमबाबा भालेराव यांनी व्यक्त केले. वडनेर ग्रामपालिकेचा आदर्श परिसरातील इतर गावातील ग्रामपालिकांनी घ्यावा, असे मत दिलीप धारराव यांनी व्यक्त केले.

जोपर्यंत समाज व शिक्षण यांचा मेळ बसत नाही तोपर्यंत शिक्षणाचा खरा हेतू साध्य होणार नाही, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी व्यक्त केल. कार्यक्रमास संस्थेचे संचालक उत्तमबाबा भालेराव, दिलीपराव धारराव, पोपटराव पाचोरकर, भाऊसाहेब भालेराव, सरपंच सुनील पाचोरकर, उपसरपंच योगेश साळुंके, सदस्य सुरेश वक्ते, अमोल माळी, संतोष सलादे, पिंपळनारे सरपंच बारकू पाटील, ग्रामसेवक, शिक्षक, लाभार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

गावातील मुलींना उच्च शिक्षणाची सोय झालेली असली तरी काही विद्यार्थिनींना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणाला मुकावे लागते. कोणीही मुलगी वंचित राहू नये, या हेतूने त्यांच्या येण्या-जाण्याचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च उचलला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT