intercast marriage
intercast marriage esakal
नाशिक

Valentine's Day Special : त्यांच्या सहकार्याने 298 आंतरजातीय जोडप्यांचे ‘कुटुंब’ सावरले!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं’ अशी प्रेमाची व्याख्या केली जात असली तरी आंतरजातीय प्रेम विवाहांना आजही फारशी समाजमान्यता नाही. अशा प्रेमियुगलांना आधार देऊन त्यांचा संस्कार उभा करण्यात नाशिकमधील ‘कुटुंब’ या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.

नाशिकमध्ये त्यांनी आजवर तब्बल २९८ आंतरजातीय विवाह लावले असून, त्यातील ७० जोडप्यांना तर त्यांनी रोजगार मिळवून देत स्वत:च्या पायावर उभे केले आहे. केवळ प्रेम व्यक्त करून न थांबता त्यांच्याही काहीतरी करून दाखवणारी ही संस्था खऱ्या अर्थाने ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करत आहे. (Valentines Day Special 298 families of intercaste couples saved by social organization Kutumba in Nashik nitiative nashik news)

प्रेमाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाइन डे दरवर्षी साजरा केला जातो. आयुष्यभर सोबत राहण्याची खूणगाठ बांधलेल्या प्रेमीयुगलांना समाज सहजासहजी स्वीकारत नाही. अशा जोडप्यांसाठी नाशिकमधील अॅड. यशपालसिंह राणा यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये सुरु केलेल्या कुटुंब या संस्थेने आधार दिला आहे.

त्यांनी आजवर आंतरजातीय असे तब्बल २९८ विवाह पार पाडले. केवळ विवाह पार पाडलेले नाहीत तर, ज्या जोडप्यांना सुरक्षेची गरज होती, त्यांना मानसिक आधारही दिला. नाशिक जिल्ह्याबाहेरील व्यक्तींनी या संस्थेच्या माध्यमातून विवाह केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

कायदेशीरदृष्ट्या विवाह नोंदणी करून देण्यासाठी ‘कुटुंब’ संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सद्यःस्थितीस अध्यक्ष अॅड.राणा, उपाध्यक्ष दिनेश कोळी, सचिव मच्छिंद्र आव्हाड, किरण आहेर यांसह सात सदस्य कार्यरत आहेत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

विवाहाचा कायदाही बदलला

विवाह नोंदणी कायद्यानुसार २०१७ पूर्वी ज्या साक्षिदारांसमोर लग्न लागले त्या साक्षिदारांना विवाह नोंदणीप्रसंगी प्रत्यक्ष हजर राहावे लागत होते. तत्कालीन समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्याकडे सामाजिक संघटनांनी पाठपुरावा करून या अटी रद्द करण्याची मागणी केली.

अखेर केंद्रीय समाज कल्याण मंत्री म्हणून रामदास आठवले आले आणि त्यांनी या कायद्यात बदल केला. विवाह नोंदणीप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अट रद्द तर झालीच शिवाय पुरोहितांमार्फत लग्न लावणेही बंद झाले.

त्यामुळे खर्चही वाचला. प्रेम विवाह करणाऱ्यांना कायद्याचा आधार तर मिळालाच शिवाय लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने प्रेमविवाहांना होणार विरोधही कालांतराने कमी होत गेला.

"प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना पूर्वी समाजात स्थान मिळत नव्हते. त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना नोकरी मिळवून देणे, भाड्याचे घर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेने पार पाडली. परिस्थिती बदलत गेली. त्याप्रमाणे आता प्रेमविवाहांना होणारा विरोध कमी झाला. कायद्याने प्रेमविवाह करणे सुलभ झाल्याने आता संस्थेचे कार्य थोड्याफार प्रमाणात कमी झाले आहे." - अॅड.यशपालसिंह राणा, संस्थापक, कुटुंब सामाजिक संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narhari zirwal: झिरवळ अजितदादांसोबतच! मविआच्या उमेदवारासोबतच्या व्हायरल फोटोबाबत केला खुलासा म्हणाले, "लोकांच्या आग्रहाखातर...."

Latest Marathi News Live Update: पुण्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे झाडपडीच्या घटना वाढल्या

RBI: सरकार होणार मालामाल! रिझर्व्ह बँकेकडून मिळणार 1 लाख कोटी; अहवालात माहिती उघड

Pravin Tarde: दोस्तीचा पॅटर्न, सिनेमातील डायलॉग अन् 'धर्मवीर' मधील सीन; पुण्यातील सभेत प्रवीण तरडेंचं खणखणीत भाषण

Palestine: पॅलेस्टाइनला 'UN'चा सदस्य होण्यासाठी 143 देशांचा पाठिंबा, जाणून घ्या भारताने काय घेतली भूमिका

SCROLL FOR NEXT