An episode of exercises in the Asiad circus. esakal
नाशिक

Valentine's Day Special : सर्कसवर निखळ प्रेम करणारे बबली चाचा! 40 वर्षांपासून प्रेक्षकांचे करताहेत मनोरंजन

आनंद बोरा

नाशिक : खरं प्रेम...एकमेकांना जपणं, दुखावलेली मनं जोडणं, सुखाबरोबर दुःखात साथ देणं ! व्हॅलेंटाइन डे’ च्या पूर्वसंध्येला अशा प्रेमाची ओळख करून दिलीयं, नाशिकमधील एशियाड सर्कसमधील चंडीगडचे ज्येष्ठ कलावंत बबली चाचा यांनी.

सर्कसवर त्यांनी निखळ प्रेम केलंय. चाळीस वर्षांपासून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करताहेत. (Valentines Day Special Bubbly Chacha who absolutely loves circus Entertaining audiences for over 40 years nashik news)

दिवंगत अभिनेते राज कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून सर्कसमधील कलावंत प्रेक्षकांपुढे ठेवला. डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर सुरू असलेल्या एशियाड सर्कसमधील कलावंतांशी संवाद साधताना बबली चाचांची भेट झाली.

कौटुंबिक गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. त्यांनी कलेवर प्रेम केले. सर्कस हेच कुटुंब मानणारा हा कलावंत सर्कसमधील सहकाऱ्यांचे ‘चाचा' बनलेत. त्यांची पत्नी टीना याही सर्कसमध्ये होत्या.

दोघांनी पंचवीस वर्षे एकत्र काम केले. सर्कसमध्ये चाचा स्केटींगचे प्रयोग सादर करतात. तसेच भवरा खेळाचे प्रात्यक्षिक आणि जोकर सोबत नाट्य पेश करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक मुलींना स्केटींगचे प्रशिक्षण दिले.

कोरोना काळात चाचा कलावंतांसह सर्कसमध्ये होते. सर्कसने आम्हाला जगायला शिकवले असे चाचा सांगतात. दोन वर्ष ते घरी जात नाहीत. त्यांना आपल्या दोन मुलांना शिकवायचे आहे. त्यासाठी पत्नीला घरी पाठवले. स्वतःच्या आयुष्यातील दुःख चेहऱ्यावर उमटणार नाही याची काळजी घेत चाचा प्रेक्षकांना पोटभर हसवतात.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सर्कसचा इतिहास

चार्ल्स डिबडीन या नाटककारांच्या सहकार्याने १७८२ मध्ये ॲस्टलेप्रमाणे एक बहुरंगी आणि वैविध्यपूर्ण कसरती खेळांचा प्रयोग संघटित केला. त्याला ‘द रॉयल सर्कस' हे नाव दिले. तेंव्हापासून हा मिश्र रंजन प्रकार सर्कस म्हणून ओळखला जाऊ लागला.

\आधुनिक सर्कसचा विकास अठराव्या शतकात झाला. इंग्लीश अश्वारोहणपटू फिलिप ॲस्ट्ली (१७४२ ते १८१४) यांना आधुनिक सर्कसचा जनक मानले जाते. रिंगणात कौशल्यपूर्ण कसरती व घोड्यांवरील खेळ करून दाखविणारे ते पहिले खेळाडू होत.

अठराव्या शतकातील युरोपीय सर्कसचे प्रयोग एकाच ठिकाणी रंगमंडलांत अथवा बंदिस्त रंजनगृहात केले जात. मोठ्या कायमस्वरूपी इमारतींमध्येही त्याचे प्रयोग केले जात. अमेरिकन सर्कस चालकांनी सर्कसचे प्रयोग ग्रामीण भागात नेण्यासाठी फिरत्या सर्कस कंपन्यांची सुरवात केली.

नॅथन हाऊ व आरॉन टर्नर यांनी आपल्या सर्कसचा प्रयोग १८२६ मध्ये प्रथमतः कॅनव्हासच्या तंबूमध्ये केला. हे मोठे तंबू सुवाह्य असल्याने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येत असत. त्यामळे फिरत्या सर्कसना ते सोईस्कर झाले. ब्रिटिश अंमलात अनेक युरोपीय सर्कस भारतात येत.

त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन व भारतीयांची स्वतंत्र सर्कस असावी, हा विचार मूर्त स्वरूपात आणून भारतातील पहिली सर्कस सुरु करणारे आद्य सर्कस चालक म्हणजे महाराष्ट्रातील विष्णूपंत छत्रे (१८४०-१९०६) हे होत. त्यांनी १८७८ मध्ये सांगलीला छत्रे सर्कसची स्थापना केली. सर्कसमधील वन्यप्राण्यांचे खेळ करण्यास बंदी आल्याने कलावंत हा सर्कसचा आत्मा बनला आहे.

"सर्कसमधील सर्व कलावंत हा माझा परिवार आहे. सर्वांच्या सुख-दुःखात आम्ही सहभागी होतो. आता पुढची पिढी सर्कसमध्ये येण्यासाठी तयार होत नाही. सरकारने सर्कस वाचवण्यासाठी गांभीर्याने विचार करावा." - बबली चाचा, ज्येष्ठ कलावंत

"सर्कस हेच आमचे कुटुंब आहे. कोरोनानंतर सर्कस चालवण्यासाठी आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. सरकारी विविध परवानगी घेताना खूप त्रास होतो. जागेचे भाडे चार पटीने वाढले. आम्ही वन्य प्राण्यांना व्यवस्थित सांभाळू शकतो. त्यामुळे आम्हाला परवानगी देणे आवश्यक आहे." - राजू खान, सर्कस मालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT