Principal Nagendra Mutkekar giving information about the rabies eradication campaign to be implemented here
Principal Nagendra Mutkekar giving information about the rabies eradication campaign to be implemented here esakal
नाशिक

Nashik News : रेबिजमुक्तीसाठी लंडनहून Van; भटक्या, पाळीव श्वानांवर करणार उपचार

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : रेबिजमुक्त शहर करण्यासाठी खास लंडनहून मागविलेली साडेसात कोटींची ऑपरेशन व्हॅन शनिवारी शहरात दाखल झाली. या मोहिमेत शहरातील श्वानांचे रेबीज लसीकरण व आवश्यकतेनुसार सर्जरी करण्यात येणार आहे.

या माध्यमातून शहरातील कानाकोपऱ्यांत पोचून भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांना रेबीज आजारावरील लस दिली जाणार आहे. नगरपालिका स्तरावर पहिल्यांदाच ही मोहीम राबविली जात असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक नागेंद्र मुतकेकर यांनी दिली. (Van from London for rabies relief Treatment of stray and pet dogs at yeola Nashik News)

रेबीजचे प्रमाण आजही शहरामधील भटक्या कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. याच रेबीजचे समूळ उच्चाटन व्हावे या हेतूने वर्ल्ड व्हेटरनरी सर्विस, मिशन रेबीज आणि अ‍ॅनिमल वेल्फेअर अँड अँटी हरासमेंट सोसायटी यांच्यातर्फे शहरात विशेष उपक्रम राबवला जाणार आहे.

पाटोदा रस्त्यावरील पशुवैद्यकीय दवाखाना येथे मंगळवारी (ता.१४) सकाळी नऊला मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. वर्ल्ड वाइड व्हेटर्नरी सर्व्हिस, नगरपरिषद व पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांच्यातर्फे शहर परिसरातील भटक्या व पाळीव श्वानांवर अॅण्टीरेबीज लस व आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

श्वानांवरील उपचारासाठी अद्ययावत साधनसामग्री आणि सुसज्ज ऑपरेशन थिएटर असलेल्या या वाहनाबरोबर असलेले स्वयंसेवक शहरात ठिकठिकाणी रेबीज लसीकरण करणार आहेत. ज्यांचे पाळीव श्वान आहेत, त्यांनीदेखील आपल्या श्वानांवर मोफत उपचार व लसीकरण करवून घेण्याचे व नगरपरिषदेकडे नोंदणी करण्याचे आवाहन पालिकेद्वारे करण्यात येत आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

खर्चिक शस्रक्रिया मोफत

उपचारासाठी जेथे हजारो रुपये लागतात, अशा शस्त्रक्रिया या व्हॅनमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मोफत केल्या जाणार आहेत. या अधिकाऱ्यांकडून संबंधितांना श्वानांच्या काळजीबाबतचे मोफत प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. तज्ज्ञामध्ये डॉ. के. एस. सुमीत, प्रवीण ओव्हळ यांचा समावेश आहे.

मोहिमेबाबत संपर्क

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे. मोहन शेलार यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांची राहण्याची व जेवणाची सोय केली आहे.

पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय येथील सहायक आयुक्त डॉ. बाळासाहेब होन व डॉ. सतीश कुऱ्हे यांच्या सहकार्याने दवाखाना परिसरात अत्याधुनिक सुविधा असलेले वाहनाची सोय करण्यात आली आहे.

तेथील सोयीसुविधांचाही सदर कार्यक्रमात वापर होणार आहे. या मोहिमेबाबत अधिक माहितीसाठी स्वच्छता निरीक्षक सागर झावरे (९४०४९७७७५९) व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कुऱ्हे (७५८८०९७१४७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT