Nilesh Sonavane esakal
नाशिक

Nashik News : वाहनाच्या धडकेत वणीचे शिक्षक ठार

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : वणी - नाशिक रस्त्यावरील दिंडोरी जवळील रणतळे शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीस दिलेल्या धडकेत वणी येथील शिक्षक ठार झाले. संताजी इंग्लिश मीडियम स्कूलचे नीलेश भीमसेन सोनवणे असे मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. (Vani teacher killed in collision with vehicle Nashik News)

शुक्रवारी (ता. ३) रात्री साडेसातच्या सुमारास वणी येथील लक्ष्मी नगर येथील रहिवासी असलेले नीलेश भीमसेन सोनवणे (वय ३०) हे नाशिक येथून वैयक्तिक कामे आटोपून दुचाकीने (एमएच १५ एचटी ५६६८) वणी येथे परतत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली.

अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला. याबाबत दिंडोरी पोलिसांत भाऊ चंदन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश सोनवणे हे वणी येथील संताजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गणित या विषयाचे शिक्षक होते.

तसेच सात - आठ वर्षांपासून खासगी कोचिंग क्लासेसही घेत होते. त्यांच्या अपघाती निधनाने वणी येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संताजी संस्थेनेही दुखवटा म्हणून आज शाळेस सुट्टी जाहीर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: हिंदू-मुस्लिम वादाशिवाय बोला: उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान; ..अन्यथा अजित पवारांची माफी मागा !

Spices Price Increase: स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! जिरे, धणे, मोहरी महागले; नवे दर काय? जाणून घ्या...

Bigg Boss Marathi 6 Live Update: घरात घुमणार अहिराणी आवाज? खान्देशी गायक करणार गेममध्ये एंट्री

Shubman Gill: विराटने वनडे, या सोप्या फॉरमॅटची निवड केली म्हणणाऱ्या मांजरेकरांना गिलचे उत्तर; म्हणाला, 'तसं असतं, तर भारताने...'

विवाहित प्रियकरासोबत तरुणीनं वंदे भारत ट्रेनसमोर घेतली उडी, छिन्नविछिन्नावस्थेत आढळले मृतदेह; एकाच कंपनीत करायचे काम

SCROLL FOR NEXT