File Photo for reference esakal
नाशिक

Nashik News | सिडकोतील वरद विनायक गणपती उद्यान : खेळण्या तुटलेल्या अवस्थेत; ग्रीन जिम फक्त नावाला

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरातील वरद विनायक गणपती उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून या उद्यानातील खेळण्या तुटलेल्या अवस्थेत असून येथील ग्रीन जिम फक्त नावाला उरलेली असल्याचा आरोप स्थानिकांमधून करण्यात आलेला आहे. (Varad Vinayak Ganapati Udyan in CIDCO Toys in broken condition Nashik News)

वरद विनायक गणपती उद्यानातील झोके तुटलेल्या अवस्थेत असून रहिवासीयांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन या बाबीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला आहे. उद्यानातील लॉन्सवर गरजेपेक्षा जास्त पाणी मारले जात असून मोठ्या प्रमाणावर चिखल तयार होत असतो. लहान मुलं खेळायला आले तर याच चिखलात त्यांना खेळावे लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक रहिवासीयांसाठी असलेल्या ग्रीन जिमची दयनीय अवस्था झाली असून अनेक साहित्य मोडलेल्या स्थितीत आहेत. त्याची देखिल दुरुस्ती होत नसल्याने उद्यानातील मंदिरात देवदर्शन करून इतर ज्या उद्यानात खेळणी सुस्थितीत असतील, अशा ठिकाणी रहिवासी त्यांच्या मुलांना घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले.

उद्यानात खेळणी तुटलेल्या अवस्थेत
शोभेच्या झाडांनी मान टाकली
लॉन्स वर गरजेपेक्षा जास्त पाणी मारण्यात येते
उद्यान परिसरात मद्यपिंचा वावर
ग्रीन जिम उरली नावाला
नागरिक इतर उद्यानात घेऊन जाणे करतात पसंत

"उद्यानात खेळणी तुटलेल्या अवस्थेत असून काही खेळणी सुस्थितीत आहेत. परंतु ज्या तुटलेल्या आहेत त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे असून उद्यान विभाग याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहे."
- सोनाली विश्वकर्मा, गृहिणी

"उद्यानातील शोभेच्या वृक्षाणं कधी खत टाकायला पाहिजे, मात्र जी वृक्ष वाढतील तीच राहत असून इतर अनेक वृक्षानी मान टाकली आहे. वृक्षांची देखभाल करणे देखिल उद्यान विभागाचेच काम आहे, मात्र या बाबीकडे लक्ष दिले जात नाही."- अनिता सोनवणे, गृहिणी

"उद्यानातील लॉन्सवर गरजेपेक्षा जास्त पाणी मारले जात असून येथे मोठ्या प्रमाणावर चिखल तयार होत असतो. अशा चिखलात लहान मुले कसे खेळतील हा प्रश्न उपस्थित राहत आहे."

- सुनील शिरसाठ, रहिवासी

"उद्यानातील ग्रीन जिम केवळ नावापुरता उरली असून अनेक साहित्याची मोडतोड झालेली आहे. मनपा प्रशासनाने जातीने लक्ष देऊन हे साहित्य दुरुस्त करावे अन्यथा नवीन बसवून द्यायला हवे." - अंकित सिंग, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT