Dignitaries and school students, teachers while distributing various materials at Varadvinayak Zilla Parishad Vasti School esakal
नाशिक

Nashik News: वरदविनायक बनतेय डिजिटल शाळा! विविध कंपन्यांनी घेतला सामाजिक कार्याचा वसा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वरदविनायक वस्ती नांदुर्डी शाळेचे निफाड व दिंडोरी पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी स्थापन केलेल्या फ्रेशयार्ड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, महिंद्र ॲग्री सोल्यूशन्स आणि एडिका, जर्मनी यांनी घेतलेल्या सामाजिक कार्याचा वसा याद्वारे रुपडे पालटले आहे. '

बुधवारी (ता. २६) महिंद्र ॲग्री सोल्युशनचे सीईओ चैतन्य राजवाडे, फ्रेशयार्डचे चेअरमन सुधाकर मेंगाणे यांच्या हस्ते शाळेला संगणक व प्रोजेक्ट प्राप्त झाला.

दर्जेदार शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी महिंद्र ॲग्री सोल्यूशन व फ्रेशयार्डने शाळा दत्तक घेत असल्याचे जाहीर करत प्रथमतः शाळेतील मुलांना शुद्ध व थंड पाणी मिळावे, यासाठी ताशी १०० लिटर क्षमतेचे जम्बो वॉटर प्युरिफायर भेट दिले. (Varadvinayak becoming digital school Various companies taken up social work Nashik News)

एडिका कंपनीनेही मुलांसाठी विविध प्रकारचे आकर्षक असे शैक्षणिक साहित्य थेट जर्मनीहून पाठवले. या सर्व साहित्यांचे अश्विनी येळगावकर, सचिन पाटील, नंदन शहा, किशोर धुमाळ, पोपटराव राऊत व फ्रेशयार्डच्या सर्व सभासदांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

संदीप मुळे यांनी प्रास्ताविकातून शाळेची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष चैतन्य राजवाडे यांनी, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

मुलांनी अभ्यासाबरोबरच व्यायाम, योगासने आणि विविध मैदानी खेळ खेळावे, असे आवाहन केले. फ्रेशयार्डचे चेअरमन सुधाकर मेंगाणे, नंदू गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने समृद्धी कोल्हे, प्रणम्य कुशारे व दिव्या खैरे यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. माता पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बापूराव पाचोरकर, किरण शिंदे, टीम महिंद्रा व पालकवर्गाचे सहकार्य लाभले. माणिक कुशारे यांनी सूत्रसंचालन केले. वाल्मीक खापरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या उपचार कसे करावे

Latest Marathi News Updates : जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Online Shopping Discount : कपडे अन् इतर वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतात? तुमच्याचं फायद्याचं आहे, पाहा एका क्लिकवर..

Crime News : हुंड्यासाठी पत्नीला मुलासमोर जिवंत जाळलं, पतीचा एन्काउंटर; पोलिसांनी झाडली गोळी

SCROLL FOR NEXT