Devendra Fadanvis Nashik Daura esakal
नाशिक

Devendra Fadanvis Nashik Daura : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या विविध कार्यक्रम

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (ता. १०) शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यासाठी येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Devendra Fadanvis Nashik Daura : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (ता. १०) शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यासाठी येत आहेत.

त्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप नाशिक महानगर शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली. (Various programs tomorrow in presence of Deputy Chief Minister devendra Fadnavis daura nashik news)

आमदार देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले व सीमा हिरे यांच्या विकास निधीतून अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यांचे लोकार्पण व अनेक कामांचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी २.३० वाजता ओझर विमानतळावर आगमन होणार असून, लगेचच दुपारी २.४५ वाजता नाशिक पूर्व मतदारसंघातील विविध कामांचे उद्‌घाटन, नंतर मॅरेथॉन चौकात जलरथाचे उद्‌घाटन, दुपारी ४ ते सायंकाळी ६ कालावधीत महाराष्ट्र पोलिस ॲकॅडमी येथील आयोजित क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ६ नंतर आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या सर्व सोयींनी युक्त अशा अत्याधुनिक सुविधा असलेल्या सातपूर पोलिस स्टेशनचे उद्‌घाटन, सायंकाळी ६.३० वाजता आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेले नाशिकच्या वातानुकूलित व अत्याधुनिक मेळा बसस्थानकाचे उद्‌घाटन होणार आहे.

मेळा बसस्थानकाच्या उद्‌घाटनासाठी मोठे संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ही शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले आहे. याच वेळी ऑनलाइन पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक पूर्व, पश्चिम व मध्यच्या आमदार निधीतून साकार झालेल्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन करणार आहेत.

दरम्यान शहरातील तिन्ही आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फलक लावून सजावट करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT