water esakal
नाशिक

Nashik News : 15 दिवसात 333 नळजोडणी खंडित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नोटीस बजावूनही पाणीपट्टी थकबाकी (Arrears) अदा न केलेल्या नळजोडणी धारकांवर विविध कर विभागाकडून नळजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मागील पंधरा दिवसात केलेल्या कारवाईत ३३३ जोडण्या तोडण्यात आल्या. (Various tax departments have taken up drive to disconnect tap holders who have not paid water dues despite issuing notices nashik news)

तीन हजार २६० घरांना भेटी देण्यात आल्या. सर्वाधिक नळजोडणी सातपूर विभागात तोडण्यात आल्या. चालु आर्थिक वर्षात घरपट्टीचे १७५ कोटी रुपये, तर पाणीपट्टीचे जवळपास ७५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पाणीपट्टीच्या एकूण उद्दिष्टापैकी आतापर्यंत जवळपास ४५ कोटी रुपयांची वसुली झाली.

पुढील दोन महिन्यात शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना नोटिसा पाठवल्या. त्याअनुषंगाने जवळपास पावणेसहा कोटी रुपये थकबाकी वसूल झाली.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

मात्र, नोटीस देऊनही ज्यांनी थकबाकी दिली नाही अशा नळजोडणी धारकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसात पश्चिम विभाग वगळता पाचही विभागांमध्ये ३३३ नळजोडणी तोडल्या. यामध्ये सर्वाधिक नळजोडणी सातपूर विभागात तोडल्या. सातपूर विभागात १३० नळजोडणी तोडल्या.

त्या खालोखाल सिडको विभागात १०८, तर पंचवटी विभागात ४४ नळजोडणी तोडल्या. पूर्व विभागात २९, तर नाशिक रोड विभागात २२ नळजोडणी तोडल्या. पश्चिम विभागात आत्तापर्यंत शून्य जोडण्या तोडल्या. अशी माहिती विविध कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT